संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय १०२४:३४विश्वाचा आभासू नाहींसा जो करी । अद्वैताची करी दीपवाळी ॥ १ ॥लौकिक सूर्याने विश्व प्रकाशितां । वाढे द्वैतावस्था फार फार ॥ २ ॥सद्गुरुस्वरूपी भानू उदया येतां । विश्वाभासू जातां न लगे वेळू ॥ ३ ॥अद्वैत स्थितीचा करी जो विकास । सकलही मायाभास नाशोनिर्यां ॥ ४ ॥नाशोनिर्यां सारी मायेची ती रात । चांदण्या नाशीत ज्ञानाज्ञान ॥ ५ ॥ज्ञानियासी देत अध्यात्माचें ज्ञान । जागृती सुदिन करी जो कीं ॥ ६ ॥ज्याच्या उदयानें आत्मज्ञान दृष्टी । मिळोनिर्यां कधी होती न जीव ॥ ७ ॥बुद्धी-बोधाचें जो करोनी मीलन । घडवी समाधान समरसतेचें ॥ ८ ॥चिदाकाशगृहीं सद्गुरुस्वरूपी भानू । निजानंदीं ध्यानू घडवीत ॥ ९ ॥सद्गुरुकृपें जाई उडुनी सारें द्वैत । भेद न रहात रेंसभरी ॥ १० ॥साधक चालती आत्मानुभव-वाट । जावोनि पावत निजानंदीं ॥ ११ ॥ज्याचिये कृपेनें लाधताति सिद्धी । भेटे निज हृदयीं आत्मारामू ॥ १२ ॥ऐसा ज्ञान-भानू सद्गुरु रामचंद्र । त्यांसी नमस्कार सर्वभावें ॥ १३ ॥तोचि करोनियां दावी सारी लीला । वदवी चरित्राला आपुलिये ॥ १४ ॥सद्गुरु बाबा आणि दुर्गाताई यांसी । शकुंतला नामेंसी जाहली कन्या ॥ १५ ॥बालपणीं तिजसी लाडें वाढविलें । उपनाम दिधलें चिमणी ऐसें ॥ १६ ॥नाना लीला करूनी रिझवी माता-पितरां । दुःखाचा तो चारा लागूं न देती ॥ १७ ॥मराठी शिक्षण जाहलें शाळेत । आंग्ल विद्या शिकत थोडी थोडी ॥ १८ ॥सुंदर देखणी अव्यंग कन्यका । उपवर झाली देखा विवाहासी ॥ १९ ॥बाबा रंगुनी गेले आत्मस्वरूपांत । कधी संसारात दुर्गाताई ॥ २० ॥खटपट विवाहाची करणार कोण । चिंतामग्न मन मातेचें तें ॥ २१ ॥बाबांचे गुरुबंधू यांनीं खटपट केली । आणिक जोडली सोयरीक ॥ २२ ॥मोतीवाले लागू होते मदतीस । गुप्च्यांनी साहाय्य केले असे ॥ २३ ॥चिमणीचे चुलते वकील जुन्नरांत । हरीभाऊ म्हणत ज्यांसी लोक ॥ २४ ॥वर्धा नगरीचे कोंकणस्थ ब्राह्मण । जया नामाभिधान खरे ऐसे ॥ २५ ॥वर नियोजिला खरे नीळकंठ । जो की अॅडव्होकेट वर्ध्यामाजी ॥ २६ ॥सुविद्य तो वर सुशील प्रेमळ । योजिला तात्काळ सकळांनीं ॥ २७ ॥सहस्रबुद्धे हरिभाऊ बंधू ते बाबांचे । देवक लग्नाचें ठेविंती ते ॥ २८ ॥अंदाजे एकोणीसशें एकेचाळीस सालीं । विवाहाची झाली पूर्तता ती ॥ २९ ॥सद्गुरु बाबा बसले तेथेच बाजूस । नेसुनी सोंवळ्यास पाटावरी ॥ ३० ॥दोहीं बाजूंचे ते वऱ्हाडी जमोन । लावियेलें लग्न शुभ वेळीं ॥ ३१ ॥शकुंतला कन्या दिधली निळकंठासी । विवाहहोमासी करोनियां ॥ ३२ ॥झाली समपदी सारे धार्मिक विधी । साधोनियां संधी मुहूर्ताची ॥ ३३ ॥वरातीची दिधली करुनी बोळवण । नामगोत्र वर्जोन कुळ तेंही ॥ ३४ ॥नीळकंठ ठेविलें नाम तें निर्मला । लक्ष्मीपूजन-सोहळा करोनियां ॥ ३५ ॥नीळकंठाचे वडील तेही होते वकील । प्रसिद्ध सकळ वर्ध्यामाजी ॥ ३६ ॥सधन गृहींचे आणि जमीनदार । आजोबा ते थोर निळकंठाचे ॥ ३७ ॥आजोबा ते होते थोर दत्तभक्त । खरे-गृहीं वसंत पुण्याई ती ॥ ३८ ॥बाबांचे जांवई वकिली करितांत । वर्धा-कचेंरीत सद्यःकाळीं ॥ ३९ ॥वकिली चांगली चालते तयांची । आहे लक्ष्मीची कृपा त्यांसी ॥ ४० ॥सुखें ते संसार करिती वर्ध्यास । करुनी पोषणास कुटुंबाचे ॥ ४१ ॥कुटुंबाचा भार मुख्य यांचे शिरीं । कुशल व्यवहारों वर्तती हे ॥ ४२ ॥स्वभाव तो गोडा मनमिळाऊ हीं । म्हणुनी मैत्री होई बहुतां ठायीं ॥ ४३ ॥यांसी कन्या तीन आणि दोन सुत । सुविद्य शिक्षित सर्वही तीं ॥ ४४ ॥नीला नीरा संध्या कन्यांचीं हीं नामें । वसती त्या प्रेम पितृगृहीं ॥ ४५ ॥नीला दिधली असे बापटांचे कुळीं । पुत्र संतती झाली तिजला दोन ॥ ४६ ॥नीरा नामें दुजी कन्या नागपुरास । दिधली पटवर्धनास सुसंपन्न ॥ ४७ ॥तिजला एक कन्या असे ती सांप्रत । वकील ते असत यजमान ॥ ४८ ॥संध्येचा विवाह होणें तो अद्याप । होईल आपेंआप त्वरितचि आतां ॥ ४९ ॥नरेंद्र तो नातू असे कीं बाबांसी । बी. ई. व्हावयासी शिकतसे ॥ ५० ॥चित्रकला यासी असे अवगत । भक्तिमार्गी असत प्रीती यासी ॥ ५१ ॥दुजा तो राजेंद्र नातू कीं बाबांचा । पुत्र नीळकंठांचा तरतरीत ॥ ५२ ॥जाहेला मॅट्रीक आतां कॉलेजांत । जातसे सांप्रत वर्ध्यासी तो ॥ ५३ ॥बाबांचा गरूड असे यांचे घरीं । कृपा घरावरि असे त्यांची ॥ ५४ ॥बाबांचे समाधि-स्थान जें पुण्यास । त्याची ही वारस असे मुलगी ॥ ५५ ॥मालक म्हणुनी तीच असे त्या स्थानाची । जाणावी हे साची सत्य वार्ता ॥ ५६ ॥खाजगी मालकींचे मुलीचें हें स्थान । सार्वजनिक जाण करावया ॥ ५७ ॥पुण्यांतील कांहीं दृष्ट त्या लोकांनीं । केला दावा द्वांर्णी कोरटांत ॥ ५८ ॥लीज-होल्डर म्हणुनी विठ्ठल गणेश जोशी । असती या स्थानासी, रजिस्टर ॥ ५९ ॥कन्येपासोनियां बाबांचें घेतलें । जोशी यांनी भलें भाड्याने हें ॥ ६० ॥समाधि-मंदिर सुधारिलें त्यांनीं । घर तें बांधोनी भव्य तेथ ॥ ६१ ॥सद्गुरू बाबांचे समाधी मंदीर । म्हणुनी पाटी थोर लावियेली ॥ ६२ ॥मुख्य प्रतिवादी करुनी विठ्ठलराव । दावा दुःस्वभाव धरूनी केला ॥ ६३ ॥फिर्यादी ते होते एस्.आर्. आंबेकर । होते समाधीवर महिने सहा ॥ ६४ ॥त्यांचे संगतीस दुजे ते बहुत । ज्यांचे हेतू नसत बरोबर ॥ ६५ ॥दुय्यम प्रतिवादी निर्मलाबाईस । केलें त्यांनीं खास कोर्टामाजीं ॥ ६६ ॥प्रभाकर जोशी, चितळे माधव । फडके वसंतराव विरुद्ध कीं ॥ ६७ ॥असिस्टंट चॅरिटी कमिशनरांचे । कोटांत हें साचें चाले काम ॥ ६८ ॥हुपरीकर नामें होते ते साहेब । बहुतचि त्यांचा आब कचेरींत ॥ ६९ ॥साडेतीन वर्षे खटला हा चालला । शेखीं निर्णय झाला कचेरींत ॥ ७० ॥सद्गुरू बाबांचे समाधि-मंदिर स्थान । खासगी तें पूर्ण म्हणुनी ठरलें ॥ ७१ ॥निर्मलाबाईच्या खाजगी मालकीचें । म्हणुनी ठरलें साचें स्थान हें कीं ॥ ७२ ॥ऐसा हा फैसला झाला कचेरींत । पराजय होत फिर्यादींचा ॥ ७३ ॥स्थानांत राहोनि फिरले स्थानावरी । ऐसे उपकारी आंबेकर ॥ ७४ ॥त्यांची वाताहात होवोनियां गेली । इष्टेट घेतली सावकारांनीं ॥ ७५ ॥नादार होवोनि बसले आंबेकर । राहण्या नाहीं घर ऐसें झालें ॥ ७६ ॥दुष्ट बुद्धीचा हा घ्या हो पडताळा । धरा वेळोवेळां मानसांत ॥ ७७ ॥बाबांच्या कन्येचें माहेर हक्कांचें । स्थान सद्गुरुंचें पुण्यांत हें ॥ ७८ ॥तेथें नित्य होत पूजा अर्चा सारी । अभिषेक पादुकांवरी बाबांच्या कीं ॥ ७९ ॥गणपति अथर्वशीर्ष श्रीसूक्त रुद्र । अभिषेक फार होत यांचा ॥ ८० ॥पवमान आणि सौराची आवृत्ती । होत ती निगुती प्रतिदिनीं ॥ ८१ ॥सप्तशती-पाठ एक नित्य होत । हनुमान-कवच वाचित दररोज ॥ ८२ ॥श्रीगुरुचरित्र श्रीगुरुलीलामृत । आणि नवनाथ वाचिती रोज ॥ ८३ ॥वैश्वदेव आणि त्रिसुपर्णासाठीं । ब्राह्मण पाचारिती भोजनास ॥ ८४ ॥श्रीसूक्ताचें होई हवन प्रतिदिनीं । गणपति अथर्वशीर्ष म्हणोनि हवन होत ॥ ८५ ॥भक्तजनांचीं तीं चालती अनुष्ठानें । सविस्तर लिहिणें दुरापास्त ॥ ८६ ॥कार्तिक पौर्णिमेस सद्गुरु बाबांचा । जन्मोत्सव खासा चालतसे ॥ ८७ ॥पालखी सोहळा जन्मोत्सव कीर्तन । करिती भक्तजन प्रेमभरें ॥ ८८ ॥विठ्ठलराव जोशी शिष्य ते बाबांचे । कीर्तन जन्मोत्सवाचें करिताती ॥ ८९ ॥बहात्तर तास चाले नामस्मरण । अविरत पूर्ण उत्सवांत ॥ ९० ॥प्रतिदिनीं लघुरुद्र अभिषेक होत । मूर्ती सजवितात बाबांची ती ॥ ९१ ॥सद्गुरु बीडकर महाराजांची मूर्ती । तीही बैसविर्ती बाबांसंगें ॥ ९२ ॥अक्कलकोट स्वामी समर्थांची मूर्ती । भक्त बैसविर्ती बाबांसंगें ॥ ९३ ॥करूनी रोषणाई विजेच्या दिव्यांची । शोभा बहुतची वाढविती ॥ ९४ ॥मंदिर-परिसरांत घालिती मंडप । भव्य तें कीं माप मंडपाचें ॥ ९५ ॥लांब लांबोनियां बहु भक्त जन । उत्सवा येवोन करिती सेवा ॥ ९६ ॥वैदिक ब्राह्मणांचे मंत्रजागर होती । विद्वान वैदिकांप्रती निमंत्रोनी ॥ ९७ ॥शास्त्री आणि संत यांचीं प्रवचनें । उत्सवाकारणें असती रोज ॥ ९८ ॥भक्त जन वाचिती धार्मिक ग्रंथांसी । करिती सोहळ्यासी आनंदानें ॥ ९९ ॥पालखी बाबांची भव्य ती सजवोन । त्रयमूर्ती जाण ठेविती आंत ॥ १०० ॥सायंकाळीं आरती जाहल्यानंतर । सोहळा तो थोर पालखीचा ॥ १०१ ॥बहुत भक्तजन करिती भजनास । टाळ-मृदुंगांस वाजवोनी ॥ १०२ ॥पालखीच्या पुढें भजनाची दिंडी । भक्तगण मांडी परमानंदें ॥ १०३ ॥अभंग ते गाती उत्साहे नाचती । नामघोषीं जाती रंगोनियां ॥ १०४ ॥मंदिराभोंवतीं प्रदक्षिणा तीन । घालिती प्रतिदिन उत्सवांत ॥ १०५ ॥पालखीच्या सर्वें छत्री अबदागीर । पुढें दंडधर चालताती ॥ १०६ ॥चवऱ्या मोरचेलें आणिक ते पंखे । घेऊनी भक्त हरिखें करिती सेवा ॥ १०७ ॥नाचती धरुनी फेर, विसरुनी देहभान । सकलही भक्तजन तये काळीं ॥ १०८ ॥प्रातःकाळापासुनी सायंकाळावेरी । सकलही हर्षे भारी करिती सेवा ॥ १०९ ॥चहा पाणी आणि अल्प उपहार । भक्तांसाठी फार असे सज्ज ॥ ११० ॥दोन प्रहरास आणिक रात्रीस । महाप्रसाद खास होत असे ॥ १११ ॥कीर्तन तें होत प्रथम तृतीय दिनीं । रात्रीं बंधु भगिनी मिळोनियां ॥ ११२ ॥कीर्तनाची सेवा करिती विठ्ठलराव । चरणीं ठेउनी भाव बाबांचे ॥ ११३ ॥जन्मोत्सव-दिनीं रात्रीचे समयास । काढिती छबिन्यास भक्तजन ॥ ११४ ॥प्रथम चौघडा आणिक वाजंत्रीं । उच्च नाद करी शिंगाड्या तो ॥ ११५ ॥त्याचीये पाठीशीं जरीपटका निशाण । घेउनि भक्तजन खडे होत ॥ ११६ ॥पालखीच्या पुढें उडविती दारू । शोभा ती अपारू वर्णावे ना ॥ ११७ ॥चंद्र सूर्य आणि गरुड हनुमंत । टके झळकत भक्तांहातीं ॥ ११८ ॥निशाणें लावोनि भक्त नाचताती । मुखानें गर्जती सद्गुरुनाम ॥ ११९ ॥पालखीचे पुढें भक्तांची ती दिंडी । नाचे निरवधी प्रेमभरें ॥ १२० ॥गावोनी अभंग करिती जयजयकार । बाबांचा तो थोर वारंवार ॥ १२१ ॥टाळ मृदुंगांनीं असे दिंडी युक्त । उत्साहे नाचत स्वानंदानें ॥ १२२ ॥नसे कोणासीही तेथ देहभान । सकळां एकचि ध्यान सद्गुरूचें ॥ १२३ ॥दिंडीचे मागुती गरुड हनुमान । घेऊनी उभे जाण मोदें भक्त ॥ १२४ ॥आणि दंडधारी घेवोनियां दंड । करिताती उदंड जयजयकार ॥ १२५ ॥शंखांचा तो नाद निनादे अंबरीं । मुदित तेणे बरी वृत्ती होय ॥ १२६ ॥मार्गे सजबोनी भव्य पालखीस । धरिती ती खांद्यास भक्तजन ॥ १२७ ॥आंत त्रयमूर्ती असती बैसल्या । दर्शन देती सगळ्या भाविकांसी ॥ १२८ ॥पालखीचे पुढें आणि पाठीमार्गे । भक्तजन उभे रक्षणासी ॥ १२९ ॥त्यांचे मागुती माय भगिनी येती । बहुतचि असती श्रद्धायुक्त ॥ १३० ॥त्याही करिती भजन नाम उच्चारोन । होवोनी तल्लीन सद्गुरुभजनीं ॥ १३१ ॥त्यांचे मागें असती रक्षणार्थ लोक । मोटारी अनेक असती संगें ॥ १३२ ॥निघोनी छबिना चाले मिरवत । ठायीं ठायीं येत भक्त-मेळा ॥ १३३ ॥सुवासिनी येती घेवोनि आरत्या । मार्गी बहुत त्या श्रद्धायुक्त ॥ १३४ ॥ओवाळुनि आरती त्यांसी प्रसाद देती । बहु भक्तां वाटिती प्रसादतो ॥ १३५ ॥ज्ञानेश्वर-पादुका-मंदिरमार्गामाजीं । तेथें आरती-काजीं पालखिंतित्पे ॥ १३६ ॥करोनि आरती तुकया ज्ञानेशांची । करिती प्रसादाची विखुरणी ॥ १३७ ॥तीन साडेतीन कलाकापर्यंत । छबिना मिरवत येत मंदिरासी ॥ १३८ ॥मार्गी पाच सात नारळ ओवाळोन । टाकिती पालखिवरून उताऱ्यार्थ ॥ १३९ ॥मंदिरासि येतां परतोनियां दिंडी । भक्तजन मांडी गजरू थोर ॥ १४० ॥मंदिराचे द्वारीं महाद्वारापाशीं । उभे पालखीसी करिताता ॥ १४१ ॥प्रथम दहींभात आणिक नारळ । ओवाळुनि सत्वर टाकिताती ॥ १४२ ॥उपरी सुवासिनी घेउनि दूधपाणी । पादप्रक्षाळणी करिती मग ॥ १४३ ॥पांच सुवासिनी घेउनि पंचारति । करिती औक्षणाप्रति सद्गुरुंसी ॥ १४४ ॥ऐसा छबिन्याचा सोहळा होवोन । जात भक्तजन भोजनासी ॥ १४५ ॥भोजनानंतर घेताती विश्रांती । थकोनियां जाती म्हणुनी भक्त ॥ १४६ ॥छबिन्याचे सर्व सरकारी पोलिस । असती रक्षणास खास ते कीं ॥ १४७ ॥बक्षीस-समारंभ होय तिसरे दिनीं । स्पर्धकां लागोनि बक्षिसें देती ॥ १४८ ॥पाठांतर आणि वक्तृत्वही तैसें । नियोजन ऐसें मंडळ करित ॥ १४९ ॥तेवीं वक्तृत्वाची करुनी चढाओढ । परीक्षा ती गोड ठेविताती ॥ १५० ॥पारितोषिकें तीं देती क्रमांकाने । तेणें स्पर्धक मनें उल्हासती ॥ १५१ ॥तृतीय दिनीं अखंड रात्रीसी कीर्तन । होवोनियां जाण लळीत होई ॥ १५२ ॥सूर्योदयाउपरी कीर्तन संपत । नारळ प्रसाद मिळत सकळिकांसी ॥ १५३ ॥आणिक उत्सवाची होतसे सांगता । तेणें होत भक्तां समाधान ॥ १५४ ॥सकळ भक्तांसाठी सद्गुरुंचे चरणीं । प्रार्थना करोनी गर्जताती ॥ १५५ ॥ऐशा उत्सवाची सांगता ती होत । भक्तजन जात निजगृहासी ॥ १५६ ॥आतां ते करीन मुख्य निरूपण । उत्सव किती पूर्ण होती स्थानी ॥ १५७ ॥सद्गुरू बाबांची पुण्यतिथी होत । श्रावण मासांत वद्य पक्षीं ॥ १५८ ॥संकष्टी चतुर्थी धरुनी सद्गुरु बाबा । समाधी घेती गा श्रावणमासीं ॥ १५९ ॥सन एकोणीसशें चौपन्न सालांत । अठरा ऑगस्टांत समाधी घेत ॥ १६० ॥बारा वाजोनियां अठ्ठावीस मिनिटांनीं । सद्गुरू बाबांनीं त्यजिला देह ॥ १६१ ॥मध्यरात्रीचा तो समय कीं होता । निवर्तीनि जातां सद्गराय ॥ १६२ ॥अठराशें शहात्तर शालिवाहन शक । होता तो कीं देख तये वेळीं ॥ १६३ ॥त्यजुनि पार्थिव देह अनंतीं मिळाले । वासुदेवानंत झाले स्वरूपीं लीन ॥ १६४ ॥भक्तजनीं केला अर्ज कलेक्टरासी । चिनमुलगुंद त्या समयासी कलेक्टर ॥ १६५ ॥जाणती कीं पूर्ण बाबांसी ते जाणा । परवानगी भक्तांना दिधली त्यांनीं ॥ १६६ ॥बक्षिस मिळालेल्या त्यांचे जागेवर । दहनाची सत्वर दिधली आज्ञा ॥ १६७ ॥पुणे म्युनिसिपालटीनें संमती देवोन । दाखविलें स्थान दहनासी ॥ १६८ ॥खंडेराव वाघ पुण्याचे नागरिक । त्यांनीं दिधली एक बक्षीस जागा ॥ १६९ ॥ज्ञानेश्वरपादुकांजवळी असे स्थान । पुणे सोळा जाण म्हणती आतां ॥ १७० ॥मिळे परवानगी भक्तजनांलागीं । मिरवणूक जंगी काढिती मग ॥ १७१ ॥परवानगीचे कामीं अण्णासाहेब गुप्ते । आणि प्रमुख होते प्र.पु. जोशी ॥ १७२ ॥अंत्ययात्रा येत ओंकारेश्वरासी । केसरी ऑफिसपाशी त्यानंतर ॥ १७३ ॥तेथोनिया आली संभाजी पुलास । ओलांडोनि त्यास जाती पुढें ॥ १७४ ॥फर्ग्युसनकॉलेज–रस्त्यावरूनिपुढती । ज्ञानेश्वर–चौकांतुनियेतीसमाधिस्थानीं ॥ १७५ ॥बहू भक्तजन जमले त्या काळीं । महायात्रा आली इष्ट स्थानीं ॥ १७६ ॥सद्गुरू बाबांचे सेवेसाठी एक । बीडकर देख सेवक देती ॥ १७७ ॥नरहर भानुदास काळे या नांवाचा । सेवक तो साचा असे जाणा ॥ १७८ ॥काळे हे देशस्थ असती यजुर्वेदी । प्रूफ करेक्टर असती ‘केसरी’ माजी ॥ १७९ ॥आतां ते निवृत्त झाले केसरींतून । स्वगृहीं राहीन करिती सेवा ॥ १८० ॥शिष्य हे विश्वनाथ चैतन्य स्वामींचे । केसकर महाराजांचे असती जाणा ॥ १८१ ॥बाबांचे हे शिष्य खचीत नाहींत । सत्य गोठी येथे लिहिणें आली ॥ १८२ ॥सद्गुरु रामानंदी देवोनि प्रेरणा । दिधले त्यां जाणा बाबांपाशीं ॥ १८३ ॥पूर्व अवतारींचा जाणोनी सेवक । सेवेलागीं देख पाचारिला ॥ १८४ ॥नाहीं राग द्वेष मनांत तो कांहीं । वदलों सत्य तेही गोठी येथ ॥ १८५ ॥अंदाजे बत्तीस तेहेतीस सालामाजीं । सेवेचिये काजीं पातले हे ॥ १८६ ॥बीडकर मठात केसकरमहाराजांसीं । नेउनी श्रीफलासी ठेवियेलें ॥ १८७ ॥समाधीचे पुढें ठेवोनि श्रीफल । प्रार्थिले दयाळ रामानंद ॥ १८८ ॥तुमची हे आज्ञा मानोनि प्रमाण । सेवेसाठीं जाण दिधला यासी ॥ १८९ ॥ऐसा विधी करुनी जाहले सेवक । नरहरि काळे एक बाबांपाशीं ॥ १९० ॥तैपासोनियां अंतकाळावेरीं । सेवेची चाकरी करित होते ॥ १९१ ॥देह त्यजायाचे आधीं वर्षे दोन । बाबा वदती जाण काळे यांसी ॥ १९२ ॥महाराजांची आज्ञा मानोनि प्रमाण । घेतलें ठेवून तुजसी येथ ॥ १९३ ॥माझ्याकडील काम तुझें तें संपलें । परतुनी जावें भलें निजगुरुपाशीं ॥ १९४ ॥निघोनियां जावें केसकरांपाशीं । सांगती त्या रीतीसी वर्ता पुढती ॥ १९५ ॥केसकर महाराज यांसी होते पाचारीत । परी काळे नच जात तयांकडे ॥ १९६ ॥बाबांनीं टोंचविले स्वतःचे ते कान । पश्चाताप मानोन काळ्यांसाठीं ॥ १९७ ॥हे गोठी घडली बावन्न त्रेपन्नांत । असे ही विदित बहुतांसीं ॥ १९८ ॥चिंता ते रचोनि देह तो बाबांचा । चितेवरी साचा ठेवियेला ॥ १९९ ॥चंदन कापूर द्रव्यें सुगंधित । घालिती चिंतेंत भक्तजन ॥ २०० ॥आणिक लावोन अग्नी तो चितेसी । करुनी धार्मिक विधीसी तये वेळीं ॥ २०१ ॥चतुर्दशदिनावेरी क्रिया कर्म । सर्वही झालें कर्म यथोचित ॥ २०२ ॥नरहरि काळे यांनीं सकळही तें केलें । अस्थिविसर्जन झालें शरयूमाजीं ॥ २०३ ॥बाळकृष्ण दातार शिष्य ते बाबांचे । मदतीस त्यांचे होते तेव्हां ॥ २०४ ॥संपवोनि अवतार बाबा निघूनि गेले । परि ते सामावले अनंतांत ॥ २०५ ॥सहस्र वर्षेंवेरी राहिन समाधिस्थानीं । भक्तांसी रक्षोनि माझिया कीं ॥ २०६ ॥ऐसें हें वचन सद्गुरु बाबांचें । असे सत्य साचें सकळ जनां ॥ २०७ ॥समाधी उत्सव होत मंदिरांत । भक्त बहु येत उत्सवासी ॥ २०८ ॥कृष्णजन्माष्टमी आणिक तो काला । समाधीचे स्थळा घडतसे ॥ २०९ ॥नारळी पौर्णिमा वरदशंकरव्रत । वरदलक्ष्मी होत व्रत तेवीं ॥ २१० ॥श्रावणी समारंभ होत याच स्थानीं । सत्यदत्तव्रतालागोनी करिती भक्त ॥ २११ ॥सत्यनारायणव्रत तेंही श्रावणांत । होत असे नित्य मंदिरीं या ॥ २१२ ॥हरितालिका व्रत आणि गणपती । प्रेमें पूजिताती भक्तजन ॥ २१३ ॥गौर आणिताती माय त्या भगिनी । तियेसी पूजोनी विसर्जिती ॥ २१४ ॥श्रीमद् अनंतव्रत भाद्रपद मासीं । अनंत चतुर्दशीसी शुद्ध पक्षीं ॥ २१५ ॥अनंत पूजन घेती तो प्रसाद । पावोनिंयां मोद अंतरंगीं ॥ २१६ ॥महालय विधी वद्य चतुर्थीस । करिती तो खास श्रीबाबांचा ॥ २१७ ॥अश्विनीं नवरात्र स्थापोनियां घट । तें कीं ठेवितात श्रींचे स्थानीं ॥ २१८ ॥ललिता पंचमी व्रत आचरती । सरस्वती-पूजा करिती तेवींच ती ॥ २१९ ॥सरस्वती बलिदान-दिवशीं करिती हवन । नवरात्र-उत्थापन करोनिंयां ॥ २२० ॥विजया दशमीसी अशमंतक शमी । वृक्षपूजा नामी करिती भक्त ॥ २२१ ॥सोनें देती घेती आणिक हर्षती । उत्साहें करिती विजयादशमी ॥ २२२ ॥कोजागिरी व्रत करिती पौर्णिमेस । नैवेद्य चंद्रास दाखवोनी ॥ २२३ ॥गुरुद्वादशीचा दिन तो पाळिती । सांप्रदायरीतीं इये स्थानीं ॥ २२४ ॥धनत्रयोदशी करुनी लक्ष्मी-पूजा । दिपवाळीचे काजा आरंभिती ॥ २२५ ॥दिपवाळी सण करिती चार दिन । तुलसीविवाह जाण करती पुढतीं ॥ २२६ ॥कार्तिक पौर्णिमेसी जन्मोत्सव होत । कथिला अध्यायांत पूर्वी याच ॥ २२७ ॥मार्गशीर्ष मासीं नैवेद्य अर्पिती । चंपाषष्ठीप्रती म्हाळसाकांता ॥ २२८ ॥मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी दिनीं । करिती मध्यान्हीं दत्तजन्म ॥ २२९ ॥या वेळीं करिताती तीन पारायणे । दांपत्य-भोजनें घालोनियां ॥ २३० ॥सायंकाळी पालखी काढोनियां भक्त । दिंडी ते काढीत स्थानांतची ॥ २३१ ॥तीन प्रदक्षिणा घालोनि मंदिरा । करिती हा पुरा उत्सव कीं ॥ २३२ ॥सकळ भक्तजनां महाप्रसादासी । देती या स्थानासी त्याच दिनीं ॥ २३३ ॥पौष मासीं होत संक्रांतीसोहळा । देती तिळगुळा एकमेकां ॥ २३४ ॥माघ शुद्ध पक्षीं विनायकी येत । चतुर्थीसी असत गणपतिकन्म ॥ २३५ ॥सहस्रावर्तनें करिती त्या दिनीं । त्या विनायकव्रता लागोनी करिती रात्रीं ॥ २३६ ॥माघ वद्य नवमी दासनवमी होत । पूजा आरती करित रामदासां ॥ २३७ ॥समर्थ रामदासांची ठेवोनी तसबीर । प्रार्थना समग्र करिती भक्त ॥ २३८ ॥त्याचे आधीं करिती दासबोध-पारायण । मनाचे श्लोक पूर्ण वाचोनियां ॥ २३९ ॥माघ वद्य चतुर्दशी शिवरात्री व्रत । पाळिताती नित्य सद्गुरूस्थानीं ॥ २४० ॥सद्गुरूपादुकांसी करिती अभिषेकासी । मध्याह्नि रात्रीसी लघुरूद्राचा ॥ २४१ ॥फाल्गुनमासीं होळी करिती पौर्णिमेस । पेटवोनि होमास सद्गुरूस्थानीं ॥ २४२ ॥फाल्गुन वद्य पक्षी दशमी तिथीस । बीडकर पुण्यतिथीस करिताती ॥ २४३ ॥करूनी लघुरूद्र पवमान-अभिषेक । मूर्ती तिन्ही देख सजविती ॥ २४४ ॥बीडकर चरित्राचें करोनी वाचन । सांगती ब्राह्मण भोजनासी ॥ २४५ ॥सायंकाळी करिती महाप्रसादासी । भक्तजन हर्षीं जमोनिंया ॥ २४६ ॥चैत्र शुद्ध प्रतिपदे गुढी उभारिती । गांठी ते अर्पिती सकळिकां ॥ २४७ ॥अक्कलकोट-स्वामीसमर्थांचा थोर । जन्मोत्सव प्रकार द्वितीयेंसी ॥ २४८ ॥द्वादश कलाक करिती नामस्मरण । लघुरूद्र जाण तोही करिती ॥ २४९ ॥सायंकाळीं पालखी दिंडीसमवेत । भक्तजन काढित मंदिरस्थानीं ॥ २५० ॥सकळिकां प्रसाद देवोनि अन्नाचा । तोष सकलांचा करितांत ॥ २५१ ॥तृतीयेसी चैत्रा गौरी बसवोन । करिताति पूजन एक मास ॥ २५२ ॥चैत्र शुद्ध नवमीसी करिती रामजन्म । मर्यादा पुरुषोत्तम पूजिताती ॥ २५३ ॥चैत्र पौर्णिमेसी प्रातःसमयासी । हनुमंत-जन्मासी साधितात ॥ २५४ ॥उधळोनि गुलाल गर्जति कपिनामं । नाचताती प्रेमें भक्तजन ॥ २५५ ॥चैत्र वद्य त्रयोदशीयुक्त चतुर्दशीस । स्वामी-पुण्यतिथीस आचरती ॥ २५६ ॥लघुरूद्राभिषेक करिताती तेथ । महाप्रसाद देत भक्तांसी तो ॥ २५७ ॥अक्षय्यतृतीया साधोनियां दिन । जयंती करिती जाण परशुरामांची ॥ २५८ ॥चैत्रमासीं होत माय-भगिनींचें । स्थानीं समाधीचे हळदीकुंकू ॥ २५९ ॥ज्येष्ठमासीं करिती वटवृक्षपूजन । पुरोहितांकडून समाधिस्थानीं ॥ २६० ॥आषाढ शुद्धांत करिती व्यासपूजा । व्यास महाराजा पूजोनियां ॥ २६१ ॥याच दिनीं करिती गुरुपौर्णिमेचा । उत्सव महत्वाचा या स्थानांत ॥ २६२ ॥आषाढ वद्य तृतीया या दिनीं कीं होत । श्राद्ध विधीयुक्त या स्थानांत ॥ २६३ ॥बाबांच्या त्या पत्नी दुर्गाताई जाणा । त्यजिती पंचप्राणा याच दिनी ॥ २६४ ॥म्हणुनी अभिषेक करिती श्रीसूक्ताचा । मंत्रजागर वैदिकांचा तोही करिती ॥ २६५ ॥टेंबे स्वामी आणि स्वामी सिद्धारूढ । यांचे दिन थोर पाळिताती ॥ २६६ ॥निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई । यांचे दिनीं होई अभिषेक ॥ २६७ ॥एकनाथ तुकाराम मोरया गोसावी । यांचे दिनीं करावी एकादशनी ॥ २६८ ॥पौष शुद्ध द्वितीया नरहरिजयंती । स्वामींची जयंती असे तेची ॥ २६९ ॥तेही या स्थानांत भक्त पाळितात । लघुरुद्राभिषेक करित सद्गुरुस्थानीं ॥ २७० ॥विश्वेश्वरअख्या अम्मा म्हणती ज्यांसी । गाणगापुरासी वसती जे कीं ॥ २७१ ॥श्रावण अमावास्या दिनीं जन्म-तिथी । अभिषेक करिती त्यांचेसाठीं ॥ २७२ ॥अश्विन वद्य षष्ठी त्यांची पुण्यतिथी । तीही पाळिताती या स्थानांत ॥ २७३ ॥माघ वद्य प्रतिपदा महत्त्वाचा दिवस । गुरुप्रतिपदा खास म्हणती ज्यासी ॥ २७४ ॥श्रीशैल्ययात्रेचें करोनि निमित्त । नृसिंह सरस्वती गुप्त होती कीं ते ॥ २७५ ॥जावोनि बैसले कर्दळीवनांत । तेचि अक्कलकोटस्वामी जाणा ॥ २७६ ॥ते दिनीं लघुरुद्र करुनी अभिषेक । प्रसाद सकळिक स्वीकारिती ॥ २७७ ॥सत्यदत्तव्रत होत या स्थानांत । महती ज्याची गात सुर नर सारे ॥ २७८ ॥करुनी दत्तात्रेय-मूर्तीचें पूजन । शास्त्रविधि-प्रमाण करिती व्रत ॥ २७९ ॥गणेशसहस्रनाम प्रतिदिनीं वाचोन । करिती आराधन हेरंबाचें ॥ २८० ॥ऐसा हा वृत्तांत सद्गुरुस्थांनींचा । निवेदिला साचा सूत्रात्मक ॥ २८१ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । दशमाध्याया झाली पूर्तता ही ॥ २८२ ॥येथून ऐका