संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ९२१:५०सकळसुरांमाजी श्रेष्ठ सद्गुरुनाथा । तुम्ही हो वाटतां मजलागीं ॥ १ ॥जागवोनि प्रज्ञा नाशितां तिमिर । अज्ञानाचा थोर जीवांचा तो ॥ २ ॥ज्ञानरवीचा कीं करोनि उदय । सुखाची ती सोय दावीतसां ॥ ३ ॥तुमचा जयजयकार करितां वाणीनें । आनंदु तो बाणे तेणें मना ॥ ४ ॥तुम्ही हो जगाचें विश्रांतीचें स्थान । साक्षित्त्वें संपूर्ण विश्व चाले ॥ ५ ॥“अहं ब्रह्मास्मि” या कथोनि मंत्रास । त्याची वाढ खास करितां तुम्ही ॥ ६ ॥आतां हात देतां तुम्ही संकटांत । दावोनियां सत्य मार्ग तो कीं ॥ ७ ॥दयेचे सागर शोभे तुम्हां नाम । कल्याण परम करीतसां ॥ ८ ॥अध्यात्माचे मार्गीं जीवा चालवोन । कैवल्य-निधान देतां त्यांसी ॥ ९ ॥तुम्ही न दिसा ज्यांसी त्यांसी हें जगत । सत्यची वाटत अज्ञानानें ॥ १० ॥परि जयालागीं दावितां स्वरूप । तयां मिथ्यारूप जगत कळे ॥ ११ ॥उपजे सत्य ज्ञान जावोनि अज्ञान । आत्मतत्त्व खूण बाणोनियां ॥ १२ ॥आत्मानात्म त्यासी उपजे विचार । सत्य ज्ञान थोर ठायीं पडे ॥ १३ ॥तुझिये स्तवनीं पडती अपुऱ्या । चारी वाणी खऱ्या सद्गुरुनाथा ॥ १४ ॥तुमचा कृपाकर पडे ज्याचे माथां । त्या जीवा योग्यता चढे थोर ॥ १५ ॥ब्रह्मा विष्णू शिव तुम्हां आराधिती । लय स्थिती उत्पत्ती साधावया ॥ १६ ॥रवि आणि शशी तुझिये सत्तेनें । तेवीं मर्यादेनें प्रकाशती ॥ १७ ॥पंचमहाभूतें खाती एकमेकां । तव आज्ञें एका वसती ठायीं ॥ १८ ॥अथांग जगतीं कवणा दाविसी माया । तेवीं बोधु सदया देसी कोणा ॥ १९ ॥मन आणि बुद्धी यांसी अगोचर । व्यापनि चराचर असिस तूं ॥ २० ॥निद्रित तूं होसी तवं माया खेळे । ब्रह्मांडाचे गोळे कल्पोनियां ॥ २१ ॥जंव तूं प्रगट होसी तवं विलया जात । माया ती लोपत तुझिये रूपीं ॥ २२ ॥अखंड प्रकाशु चैतन्याचा दीपू । अससी निर्लेपू सर्वांतोनी ॥ २३ ॥शब्द कैसा वानूं महिमा सद्गुरुनाथा । मौनें चरणीं माथा ठेवियेला ॥ २४ ॥होवोनी निःशब्द जाहलों निवांत । वर्षी कृपामृत झडकरी ॥ २५ ॥तुझें हें चरित्र तुवां बोलवावें । आणि तोषवावें सकळिकां ॥ २६ ॥ऐसे जे सद्गुरु बाबा रामचंद्र । जगतीं अवतार धरूनी आले ॥ २७ ॥त्यांचा उपदेश जीवा काय कैसा । तराया भवाचा सागरू हा ॥ २८ ॥जीव भांवावोन विसरोनि स्वरूपा । मानी नामरूपा सत्यचि तो ॥ २९ ॥अनित्य तें मानी नित्य सर्वकाळ । प्रवृत्तीचा खेळ खेळोनियां ॥ ३० ॥असतां आत्माराम हृदयीं रात्रंदिन । गेला विसरोन तयालागीं ॥ ३१ ॥पंचभूतांचा हा नाशवंत देह । तेथें धरितो भाव नित्य ऐसा ॥ ३२ ॥असोनियां एक कल्पितो अनेक । न करी तो विवेक कदाकाळीं ॥ ३३ ॥आशा तृष्णा इच्छा मोह आणि माया । पांच जणी जीवा या वेढीताती ॥ ३४ ॥मुख्य ते वासना आणिक कल्पना । गांजिती जीवांना अपरंपार ॥ ३५ ॥सप्त पाताळांसी समही स्वर्गासी । तेवीं भूलोकासी नाचविती ॥ ३६ ॥मिथ्या अहंपण नसतेंच घेई । मी मी ऐसें पाहीं वदतसे ॥ ३७ ॥मग मायासंगे कल्पोनियां द्वैत । न स्मरे अद्वैत आपुलें तें ॥ ३८ ॥मी तूं मी तूं म्हणुनी धरी अभिलाष । करीतसे भाष संसाराची ॥ ३९ ॥आणि कल्पों लागे कल्पनेचे संगें । तें तें तिसरें घे आकळोन ॥ ४० ॥मी तूं तें हे तीन मानोनियां नित्य । वाढवी अनित्य संसारू हा ॥ ४१ ॥मन बुद्धी चित्त आणिक अहंता । यांसी जागविता म्हणे मीच ॥ ४२ ॥नाना विषयांचे संगीं मानी सुख । जन्म मृत्यु दुःख स्मरेचि ना ॥ ४३ ॥काम क्रोध लोभ आणिक तो दंभ । मद मत्सर स्वयंभ वाढवी तो ॥ ४४ ॥चिळस' न वाटे पचतां' नरकांत । दुःखा न स्मरत ते ठायींच्या ॥ ४५ ॥पंचप्राण देहीं मीच चाळविता । सकळीं माझी सत्ता ऐसें वदे ॥ ४६ ॥दश इंद्रियांचे दहाही विषय । धरी तेथें सोय सुखासाठीं ॥ ४७ ॥माता पिता बंधु आणिक भगिनी । सोयरीं हीं मानी जीवींचीं कीं ॥ ४८ ॥कांतेवरी प्रेम करी प्राणाहीन । मेळवाया पूर्ण विषयसुख ॥ ४९ ॥कांता दुहिता सुत म्हणे माझे माझे । वासनेचें ओझे वाढवीत ॥ ५० ॥नाना उदिम करी जातो बहुतचि ठायीं । श्रमतसे वायां रात्रंदिन ॥ ५१ ॥धन मान यांची करोनियां जोड । पुरवितो कोड इंद्रियांचें ॥ ५२ ॥गेला विसरोन देहा असे मरण । जाणे तो सोडून घडेल कीं ॥ ५३ ॥विवेक विचार न करी अंतरीं । भक्ती ते न बरी स्वीकारित ॥ ५४ ॥सत्य ज्ञान जें कीं चुकवी जन्ममरण । स्वप्नींही स्मरण न करी त्याचें ॥ ५५ ॥मदोन्मत्त होय असतां शरीरीं शक्ती । योजी नाना युक्ती अर्थासाठीं ॥ ५६ ॥अनित्य जो अर्थ पाववी अनर्थ । त्याचे ठायीं स्वार्थ वाढवीतो ॥ ५७ ॥न स्मरे हरीसी न करी पूजा-पाठ । सदैव ती ताठ ठेवी मान ॥ ५८ ॥ऐसा भ्रमत असे येथें मायाजाळीं । परी न देखे जवळी असुनी हरी ॥ ५९ ॥ऐसे जे कीं जीव भ्रमती संसारांत । होवोनियां त्रस्त तापत्रयें ॥ ६० ॥आध्यात्मिक आणि आधिदैविक तो । ताप कीं गांजितो नाना रीतीं ॥ ६१ ॥आधिभौतिकाचा ताप होई फार । सोसवेना थोर तापत्रय ॥ ६२ ॥नाना आधिव्याधी गांजिती जीवास । शारीरिक त्रास तैसे बहु ॥ ६३ ॥मानसिक त्रास ताप देती फार । करोनी बेजार जीवालागीं ॥ ६४ ॥भोगोनि तापांसी पावला जो शीण । मग तो नारायण आठवीत ॥ ६५ ॥आर्त तो पीडित बहुत गांजला । सोडवी न त्याला तेव्हां कोणी ॥ ६६ ॥मायेचीं पिसुणें सकळही जाती दूर । एकला हा थोर सोशी दुःख ॥ ६७ ॥ऐसा जो पोळला संसारीं विटला । उपरती पावला अंतरीं जो ॥ ६८ ॥अंतःकरणींतोनी प्रार्थी जो देवास । सोडवी तूं खास म्हणे आतां ॥ ६९ ॥नको मायाजाळीं गुंतवूं मजला । आलों शरण तुला सर्वभावें ॥ ७० ॥म्हणे सद्गुरुनाथा तारीं तारीं आतां । बापा कृपावंता मज दीना ॥ ७१ ॥गेलें आयु माझे रमतां संसारांत । न केला परमार्थ कवणे काळीं ॥ ७२ ॥अहंतेच्या योगें जाहलों उन्मत्त । पाहिलें न हित कैसें काय ॥ ७३ ॥कोठोनि मी आलों कवण्या ठायीं जाणें । कां मज घडलें येणें जगतांत ॥ ७४ ॥पुढतीं मजला जन्म येईल कोठें कैसा । विचार मी ऐसा नच केला ॥ ७५ ॥आतां सद्गुरुनाथा दावा मार्ग कांहीं । जेणें तरुनी जाई भवाब्धी हा ॥ ७६ ॥ऐसा जो शरण बाबांचे चरणीं । गेला जीव झणीं निरहंकारें ॥ ७७ ॥तयासी तराया संसार-सागरीं । युक्ती ते सोपारी दावितांती ॥ ७८ ॥पावोनियां थोर पश्चाताप आंत । झाला शरणागत चरणीं त्यांचे ॥ ७९ ॥मग सान थोर म्हणती न त्यासी । मार्ग तरायासी दाविताती ॥ ८० ॥परी प्रथम पोटीं व्हावा अनुताप । मग आपेंआप दाविती वाट ॥ ८१ ॥पाहोनि प्रारब्ध संचित जीवाचें । क्रियमाण त्यांचें अवलोकिती ॥ ८२ ॥कांही पुण्य गांठीं असतां पूर्वार्जित । कथित मार्ग हित व्हावयासी ॥ ८३ ॥दुर्जन दुराचारी दांभिक ते येतां । त्यांसी झिडकारितां वेळू न लगे ॥ ८४ ॥बहुत दिसांची साचलीसे घाण । दुर्गंधी सुटोन त्रस्त झालों ॥ ८५ ॥निसटा निसटा आतां बैसूं नका येथ । वाटेसि लावीत वदुनी ऐसें ॥ ८६ ॥परी पूर्व पुण्य ज्यांचें फळा आलें । त्यांसी जवळी केले बाबांनीं तें ॥ ८७ ॥पाहोनियां भाव असे केवीं कैसा । देती त्यासी तैसा मार्ग ते कीं ॥ ८८ ॥अधिकारसम देती उपदेश । न होती ते वश सहजासहजीं ॥ ८९ ॥सर्व काळ असती स्वरूपीं रंगोन । देहा विसरोन सद्गुरु बाबा ॥ ९० ॥मार्ग हा बाबांचा असे कीं धुरेचा । विहंगम साचा म्हणती ज्यासी ॥ ९१ ॥विहंगम म्हणजे उडुनी पक्षासम । गांठणें निजधाम आत्मयाचें ॥ ९२ ॥एका निमिषामाजीं पाहतां पाहतां । आत्मस्वरूपीं मिळतां वेळू नाहीं ॥ ९३ ॥राजयोगामाजीं असती पांच भेद । जे कीं शास्त्रशुद्ध वेदमान्य ॥ ९४ ॥पिपीलिका म्हणजे मुंगीसम जाणें । एक एक ओलांडणे कमल तें ॥ ९५ ॥मूलाधारापासोनि सहस्रारावेरीं । ओलांडणे बरीं कमलें तीं ॥ ९६ ॥दुजा कपिमार्ग असे उड्डाणाचा । सद्गुरु देत साचा किती एकां ॥ ९७ ॥एका स्थानाहोनी त्यजुनी मधलीं स्थानें । उडी ती मारणें पुढिले स्थानीं ॥ ९८ ॥कपीसम उड्डाणें घेतघेत जाणें । शेवटीं पावणें सहस्रदळीं ॥ ९९ ॥तिजा मीनमार्ग असे कितीकांचा । ध्यानीं धरा त्याचा उपक्रम ॥ १०० ॥येथ ना कमळ नाहीं दुजें कांहीं । मीनासम पाहीं लक्षीं दृष्टी ॥ १०१ ॥जीव हाचि मीन चैतन्यसागरीं । स्थित मध्यावरी होउनि असे ॥ १०२ ॥लावोनियां लक्ष आत्मस्वरूपांत । स्थित तो निवांत साधक राही ॥ १०३ ॥परमात्मस्वरूपाचा भरलासे सागर । व्यापोनियां थोर दश दिशा ॥ १०४ ॥ऐशा त्या सागरीं मीनासम जाणें । अंतर्बाह्य लक्षणें आत्मतत्त्व ॥ १०५ ॥शेखीं चिदाकाश मिळतां महदाकाशीं । मीन सागराशीं एक होय ॥ १०६ ॥तेवीं तो चतुर्थ जाणा शांभवीचा । मार्ग साधकाचा असे उच्च ॥ १०७ ॥श्वासोच्छ्वासीं चाले जप सोऽहं सोऽहं । सांडोनियां अहं स्मरणें तोची ॥ १०८ ॥ध्वनीवरी लक्ष अखंड ठेवीन । दृष्टीनें न्याहाळोन प्रकाशू तो ॥ १०९ ॥प्रकाश नादाची होतां ऐक्यावस्था । सोऽहं हं सः होतां न लगे वेळ ॥ ११० ॥याच मार्गे पुढती अनुभव घेवोन । प्रणव सांडोन होणें बिंदू ॥ १११ ॥बिंदूच्या मध्य जावें तो फोडोन । चिदाकाश पूर्ण आटे येथ ॥ ११२ ॥सहस्त्रकमलांत जाई तेव्हां पाहीं । पसेरोनि बाही सोऽहं भावें ॥ ११३ ॥हं सः सोऽहं ऐसें होत उफराटी । विद्युल्लता दिठी सामावेना ॥ ११४ ॥अनंत अपार प्रकाशू तो थोर । सहस्र भास्कर उणें जेथ ॥ ११५ ॥शब्दों न बोलवे कैसें तें वदावें । सद्गुरुकृपें घ्यावें जाणोनियां ॥ ११६ ॥पिंडा पदीं येथ होत मेळवणी । साधली पर्वणी सायोज्याची ॥ ११७ ॥हे सारे सगुण मार्ग जाणा तुम्हीं । निर्गुणाचे कामीं उपयोगी ॥ ११८ ॥खरा तो निर्गुण असे मार्ग शेष । विचार संधीस पाहणें जें कीं ॥ ११९ ॥विचारू तो एक निघोनियां जात । दुजा उद्भवत मानसीं तो ॥ १२० ॥दोन वृत्तींमाजी असे जें अंतर । तेंचि परात्पर स्वरूप जाणा ॥ १२१ ॥तया नाहीं रूप तया नाहीं नाम । असे पूर्णकाम सद्गुरु आत्मा ॥ १२२ ॥अंतरीं जाणीव ते घेणें ध्यानास । जाणीवेचें खास साक्षी होणें ॥ १२३ ॥मूळीं जेथोनियां प्रगटे संवेदना । जाणे त्याचे स्थाना शेखीं अंतीं ॥ १२४ ॥यावीण परमार्थ नाहीं तो कीं दुजा । गुरु पुत्र उमजा अंतरंगीं ॥ १२५ ॥आदिनाथ कथिती सव्वा लक्ष योगू । शब्द कैसे सांगूं वर्णोनियां ॥ १२६ ॥सहजीं सद्गुरूंनी जें कीं वदविलें । भेद हे कथिले प्रेरणेनें ॥ १२७ ॥मूळ स्वरूपांत नाहीं तें कीं भेद । आहे तें अभेद स्वयंप्रभ ॥ १२८ ॥नामें असती नाना परी वस्तू एक । आत्मस्वरूप देख म्हणती ज्यासी ॥ १२९ ॥आमुच्या शाखेंत स्वरूपसंप्रदाय । मुख्य हाचि होय बीडकरांचा ॥ १३० ॥अधिकारियासी बाबा हा कीं देती । गुरुकृपें प्रचीती येई त्याची ॥ १३१ ॥शास्त्रीं जें लिहिलें गुरूंनीं दावियलें । अभ्याससितां भलें कळों येई ॥ १३२ ॥परी सद्गुरुकृपा जाहलियाविण । न फळे हा जाण मार्ग कवणा ॥ १३३ ॥वाचोनी करितां मग पस्तावणें । खुळे वेडे होणें घडे ऐसें ॥ १३४ ॥अनधिकाऱ्यासी मार्ग हा न देणें । शक्तिपात न करणें कच्च्या जीवा ॥ १३५ ॥करितां शक्तिपात जिरेना तो त्यांसी । न करी साधनासी चावडु होय ॥ १३६ ॥प्रथम धर्माचारें करणें कर्म सारें । देहशुद्धी ती रे साधावी कीं ॥ १३७ ॥नित्य नैमित्तिक कर्मे आचरोन । फलेच्छा त्यजोन राहणें तेथ ॥ १३८ ॥ईश्वरनामस्मरण घेउनि करणें जप । दवडावें पाप येणें मार्गे ॥ १३९ ॥हरिनाम घेतां पुण्याई वाढतां । पाप सरुनी जातां वेळु न लगे ॥ १४० ॥जांवोरि ज्ञानाचा मार्ग न मिळे हाता । तोवरि कर्मपथा सोडों नये ॥ १४१ ॥ज्ञान झालें तरी कर्म ना सांडावें । ईश्वरीं अर्पावें सर्वस्वेंसीं ॥ १४२ ॥विश्वासाठीं संतां करणें तप थोर । व्हावया उद्धार जड-मूढां ॥ १४३ ॥कर्माहंता नाहीं अपेक्षी ना फल । कर्मबंध सकळ गेले त्याचे ॥ १४४ ॥देह असे तंव कर्म तें न सुटे । वाउगें चावटें बोलों नये ॥ १४५ ॥देहीं चाले कर्म ज्ञानी तेथ नसे । ज्ञानें बंध त्याचे तुटुनी गेले ॥ १४६ ॥जरी व्हावा सद्गुरू वाटे जीवा फार । तरी स्वयं आचार सुधारावा ॥ १४७ ॥यमनियमांचें करावें पालन । शम दम जाण पाळावे ते ॥ १४८ ॥स्थल काल देश पाहोनि वर्तणें । संगती धरणें सज्जनांची ॥ १४९ ॥संतांचा सहवास आश्रयो नामाचा । वैखरी नामाचा करणें घोषू ॥ १५० ॥चारी वाणींमाजी उमटतां नाम । उमजाया वर्म न लगे वेळू ॥ १५१ ॥साधनचतुष्टयसंपन्न तें व्हावें । आणिक लागावें सद्गुरूचरणीं ॥ १५२ ॥कापुराची राशी जळतां वेळु नाहीं । लागे वेळु तोही ओल्या काष्ठा ॥ १५३ ॥कापुराची वाती उजळली ज्योती । झाली ते समाप्ती काजळीवीण ॥ १५४ ॥यमनियमादिक आचरोनि मग । साधावा तो योग आसनाचा ॥ १५५ ॥एक प्रहरवेळीं करणें आसनसिद्धी । सांडोनि उपाधि आधिव्याधी ॥ १५६ ॥न पडतां कष्ट आसनीं बैसणें । देह न हलविणें किंचितही ॥ १५७ ॥कळ ना लागावी कंड ना सुटावी । कांहीं न ती व्हावी हालचाल ॥ १५८ ॥घेवोनि आसन बैसावें त्यावरी । साधावी ती खरी आसनसिद्धी ॥ १५९ ॥उपरी प्राणायाम सद्गुरु कथिती तैसा । साधावा तो तैसा तया रीतीं ॥ १६० ॥केवळ कुंभक सिद्ध व्हावयासी । अनेक रीतीसी बोधिताती ॥ १६१ ॥केवळ कुंभक होतां आपेंआप । प्राणापानीं चाप लागतसे ॥ १६२ ॥मूलबंध होय होय तो उडियान । जालंदर जाण तैसा होय ॥ १६३ ॥मुद्रा ते गोचरी किंवा ते खेचरी । कथिती सद्गुरु तरी करणें ती गा ॥ १६४ ॥बसुनी सहजासनीं अलक्ष्यीं लक्षिणें । मुद्रा ती साधणें हेंचि मुख्य ॥ १६५ ॥मग प्रत्याहार यत्नें तो साधावा । मार्ग तो चालावा गुरुकृपें ॥ १६६ ॥गुरु सांगताती तेथें धरणें लक्ष । राहोनिऱ्यां दक्ष अभ्यासांत ॥ १६७ ॥मन तेथोनिऱ्यां जातां दुजे ठायीं । परतोनिऱ्यां तेंही घेणें मागें ॥ १६८ ॥जाई जेथ जेथ तेथोनि ओढावें । निज खुणे लावावें आणोनियां ॥ १६९ ॥क्षणोक्षणीं हाचि यत्न तो करणें । प्रत्याहार जाणें नाम यासी ॥ १७० ॥सांडोनि विषयांचा आहार मनाचा । देणें स्वरूपाचा चारा त्यासी ॥ १७१ ॥हाची प्रत्याहार गुरुकृपें साधितां । वेळु न लागे चिंता बोध व्हाया ॥ १७२ ॥प्रत्याहारें तें कीं स्थिरावतां मन । राहे चिकटोन तेथेंचि तें ॥ १७३ ॥मग तें न उठे स्वरूपापासोनी । दृढ राहे धरुनी स्वरूपची ॥ १७४ ॥स्वरूपाची गोडी न सोडी सर्वथा । धारणा ती होतां वेळ नाहीं ॥ १७५ ॥दृढ ती धारणा होवोनिऱ्यां ध्यान । लागलें संपूर्ण स्वरूपाचें ॥ १७६ ॥लागली मनासी स्वरूपाची गोडी । सांडोनी आवडी विषयांची ॥ १७७ ॥स्थिरावलें मन आणिक ती बुद्धि । हरली ते उपाधी अंतर्बाह्य ॥ १७८ ॥ध्यान तें लागलें अखंडित पाहीं । न सांडी कदाही धरिला ठावो ॥ १७९ ॥चित्त चैतन्यांत गेलें मिसळोन । स्फुरेना मीपण ऐसें झालें ॥ १८० ॥पुसोनियां गेला अहंतेंचा ठावो । मी-तूंण वावो ३ जाहलेंसे ॥ १८१ ॥ध्यान पक्क झालें मन तें मुरालें । स्वरूप भरलें अंतर्बाह्य ॥ १८२ ॥ध्याता ध्येय ध्यान झालें एकरूप । समाधीचें सुख आलें हाता ॥ १८३ ॥संकल्प विकल्प अवघा मावळला । कल्पनेचा झाला मोडू पुरा ॥ १८४ ॥मग अवघाचि भरलासे आत्मा । आत्मा-परमात्मा द्वैत गेलें ॥ १८५ ॥अखंडित मग सहज समाधी । विधीं पाहे दिठी आत्मरूप ॥ १८६ ॥अंतर्बाह्य दोन्ही ठायीं आत्मा । पाहणें पाहाता नामा उरेचि ना ॥ १८७ ॥वरौता अवघा एकचि अभ्यासू । जाणीवेतं ध्यासू जाणीवेचा ॥ १८८ ॥जाणीव नेणीव दोन्ही हरपलीं । ठायींच विराली कर्पूरज्योती ॥ १८९ ॥सद्गुरु ते बाबा मनाचा हा योगु । देती कवणा सांगूं कृपा करुनी ॥ १९० ॥कवणासी कथिती सगुण करा ध्यान । कवणा नामस्मरण घ्या रे म्हणती ॥ १९१ ॥जया जया योग्य त्या त्या देवतेची । उपासना साची देती त्यांसी ॥ १९२ ॥कवणासी विष्णु कवणातें शंकरु । नामाचा निर्धारू निवेदिती ॥ १९३ ॥कवणा हनुमान कवणा तो श्रीराम । कवणा पूर्णकाम गजानन ॥ १९४ ॥कवणातें श्रीकृष्ण कवणा रुक्मिणीरमण । दत्त तो जाणोन कथिती कोणा ॥ १९५ ॥कोणा भगवती कोणासि ते भक्ती । कोणातें बोधिती कर्मयोगू ॥ १९६ ॥संसारीं राहोनी करावें भजन । देवाचें स्मरण करा कांहीं ॥ १९७ ॥दक्षता धरोनी करावा संसार । न सांडा व्यवहार आपुलाले ॥ १९८ ॥कोणां गुरुभक्ती कोणां स्वामिसेवा । कोणां म्हणती गावा व्यंकटेश ॥ १९९ ॥पाहोनिर्यां भाव वदती सद्गुरुराव । साधा रे वैभव आत्मारागीं ॥ २०० ॥बैसोनियां स्वस्थ संध्या हे साधावी । सायुज्यता घ्यावी मेळवोन ॥ २०१ ॥कवणा गुरुभक्ती दाविती उकलोन । कवणा सद्गुरुध्यान करा म्हणती ॥ २०२ ॥मुख्य तो सद्गुरु देवांचाहि देव । ऐसा दृढ भाव धरों मुख्य ॥ २०३ ॥सद्गुरूंवांचोनी कोणी न तारील । याचा अर्थ खोल ध्यानीं धरा ॥ २०४ ॥आसनीं बैसोनी स्वस्थ तें कीं व्हावें । मिटोनियां घ्यावे चर्म-चक्षु ॥ २०५ ॥मेरुदंड ताठ ठेवोनी बैसणें । सहजीं ते साधणें बंध तीन ॥ २०६ ॥बैसोनियां ऐसें बघणें आकाशांत । जें जें दिसे तेथ दिठीसी कीं ॥ २०७ ॥एक तारा अथवा नक्षत्र धरोन । धरावी ते खूण दृढतर ॥ २०८ ॥दिसेल तें पाहावें ध्यानीं तें धरावें । दिसे तोंवरी राहावें पहातची ॥ २०९ ॥सद्गुरुकृपेनें कवणा दिसे काय । जयाची त्यानें सोय धरणें दृढ ॥ २१० ॥ऐसें न्याहाळीत करावा अभ्यास । राहोनि उदास देहधर्मी ॥ २११ ॥आहार विहार सात्त्विक ठेवावा । स्पर्शु तो न व्हावा रज-तमीं ॥ २१२ ॥शुद्ध सात्त्विक तें बाणावें अंतरीं । परमार्थ सत्वरीं साधे तेणें ॥ २१३ ॥परिमित निद्रा परिमित जागणें । परिमित सारे करणें व्यवहार ॥ २१४ ॥आचार विचार आणिक उच्चार । ऐक्य यांत फार असणें मुख्य ॥ २१५ ॥आराध्यदेवता नित्य उपासावी । नामस्मरणीं व्हावी वाढ सदा ॥ २१६ ॥भोजनाचे आधीं स्वस्थ तें बैसोन । अभ्यास करोन साधन साधा ॥ २१७ ॥साधा क्षणोक्षणीं आपुलालें हित । बाष्कळपणें मात न बोलावी ॥ २१८ ॥परिमित बोलणें परिमित चालणें । परिमित अवघा करणें व्यवहारू ॥ २१९ ॥तनु मनु धनें करणें सद्गुरुसेवा । हाचि धर्म व्हावा जीवनाचा ॥ २२० ॥ऐसें ऐसें बाबा मौनत्वें कथिती । उक्त जीवांप्रती होय जें जें ॥ २२१ ॥सत्यची बोलावें धर्मा सांभाळावें । आचार करावे शुद्ध तेची ॥ २२२ ॥हितकर ऐसें वदती ज्याचें त्यास । लाविती मार्गास योग्य जीवा ॥ २२३ ॥ऐसे सद्गुरु बाबा जीवा साहा होती । देवोनी प्रचीती स्वयं काही ॥ २२४ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । नवमाध्याय झाली पूर्ती येथ ॥ २२५ ॥येथून ऐका