संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ११२७:५४तूंचि गणपती गणांचा तूं स्वामी । नमितों तुजला मी सर्वभावें ॥ १ ॥तुझी योगमाया प्रकाशी जगासी । माया सत्तादासी तुझी असे ॥ २ ॥धीदुर्गपुरांत घेउनि जीवभाव । बद्ध आत्मदेव असे झाला ॥ ३ ॥सत्त्व रज तम तीन तट त्यासी । कोंडिती सर्वस्वेंसीं अटकेमाजी ॥ ४ ॥तया आत्मदेवा शंभू सोडवीत । स्मरोनी तुजप्रत गजवदना ॥ ५ ॥तोचि तूं सद्गुरु शिवाहोनि श्रेष्ठ । मानोनि वरिष्ठ नमितों चरणी ॥ ६ ॥मूढ अज्ञानासी तूं बा वक्रतुंड । ज्ञानियां अखंड सामोरा तूं ॥ ७ ॥दृष्टी उघडोन जब तूं झांकिसी । उत्पत्ती प्रलयासी तंववरी करिसी ॥ ८ ॥तव माया नृत्य हाचि जगदाभास । दाविसी तूं खास तांडव करुनी ॥ ९ ॥अहो सद्गुरुनाथा करितां ज्यांवरि प्रेम । सकळीं आत्माराम भेटे त्यांस ॥ १० ॥ऐसा तूं सोयिरा होसी जगीं ज्याचा । त्यासी मीपणाचा फुंज न उरे ॥ ११ ॥तुझ्या ऐक्यबोधीं करितां तुझें ध्यान । देसी तुझें पूर्ण प्रेम त्यासी ॥ १२ ॥शब्दज्ञानें न लगे तुमचा वेदां अंत । तुम्ही सद्गुरुनाथ श्रुतिसी पैल ॥ १३ ॥मौन हेंचि तुझें असे राशींनांव । म्हणुनी मौनें स्तव करितों तुझा ॥ १४ ॥ऐशा तुम्हां पायीं साष्टांग वंदन । सर्वस्वें करोन पूजितसें ॥ १५ ॥ऐसे जे सद्गुरु वासुदेवानंत । बाबा ज्यांसी वदत भक्तजन ॥ १६ ॥नारायणपेठेंत धुमाळांचा वाडा । मांडोनी बिऱ्हाडा वसती तेथ ॥ १७ ॥जवळिच अष्टभुजा जगदंबेचें स्थान । शक्तीसन्न्रिध जाण राहताती ॥ १८ ॥एकोणीसशें तीस एकतीस सालांत । गोठी घडुन येत तेची परिसा ॥ १९ ॥विष्णू आणि हरी सखाराम जोशांचा । नातू जों कीं साचा विठ्ठल तो ॥ २० ॥इंग्रजी सहावीच्या परीक्षेस न बसतां । पळाला स्वहिता साधायासी ॥ २१ ॥अठरा वरुषांचें असे वय त्यांचे । घरदार यांचें सोडी नांव ॥ २२ ॥रत्नागिरीहोनि पुण्यासि तो आला । मुंबईमार्गे भला एकलाची ॥ २३ ॥येवोनि राहिला बीडकर मठांत । वासुअण्णा देत आश्रय त्यासी ॥ २४ ॥ठेवोनि घेतलें आणि संरक्षिलें । बाळासम केलें प्रेम त्यांनीं ॥ २५ ॥आश्रासोनि त्यासि जवळी ठेवीत । वासुअण्णा भागवत कृपावंत ॥ २६ ॥परमार्थीत यांची उच्च ती तयारी । निस्पृह ते भारी असती जाणा ॥ २७ ॥सदा अंतर्मुख होवोनी वर्तती । बीडकर मठाप्रती प्रमुख ट्रस्टी ॥ २८ ॥त्या काळीं मठांत सुत-पत्नीसह । राहती ते देह कष्टवोनी ॥ २९ ॥पंचसूक्त पवमान मठीं नित्य होत । अभिषेक करीत ब्राह्मण ते ॥ ३० ॥रानडे म्हणोन तरुण ब्राह्मण । सर्वही पूजा करून राहती तेथ ॥ ३१ ॥आतां ते कीं गेले देह सोडोनिसां । मठावरी माया असे त्यांची ॥ ३२ ॥मठाचे समोरीं मठाचेंच घर । दुसरे रानडे तत्र राहताती ॥ ३३ ॥वासुअण्णांसी ते बरें न पाहती । कधीं कधीं येती मठीं ते कीं ॥ ३४ ॥हेही येती पुढें बाबांचे दर्शना । गोड गोड जाणा खावयासी ॥ ३५ ॥तेही आतां गेले झाले स्वर्गवासी । सांप्रत पूजेसी गुणे करिती ॥ ३६ ॥गुणे गुरुजी फार असती प्रेमळ । पूजा पाठ सकळ करिती प्रेमें ॥ ३७ ॥गीताबाई आणि कन्या यमू त्यांची । राहाती मठामार्जी तयें काळीं ॥ ३८ ॥रंगोबा भागवत होते देशभक्त । राहाती मठांत सेवा करुनी ॥ ३९ ॥गुरुचरित्राचे एकशें ते आठ । केले यांनी पाठ त्या काळांत ॥ ४० ॥दाढी जटा दोन्ही असती वाढवोन । शक्तीनें संपन्न देह त्यांचा ॥ ४१ ॥त्या काळीं मठांत दामले शेषशायी । येती नित्य तेही दर्शनास ॥ ४२ ॥भीमाशंकर जोशी येवोनी राहती । रुद्राभिषेक करिती शिवपिंडीसी ॥ ४३ ॥एकभुक्त ते कीं वसती मठांत । पुसाळकर येत कधीं कधीं ॥ ४४ ॥काशिनाथपंत गर्दे कधींतरी दर्शना । बाहेरूनी जाणा येती मठीं ॥ ४५ ॥सब्बज होते नागपूर बुलढाण्यासी । तयारी परमार्थासी यांची बहुत ॥ ४६ ॥शिवरामपंत खांडेकर तेही मठीं येत । करिती सुखसंवाद वासुअण्णापाशीं ॥ ४७ ॥शिखरे वैद्य येती दर्शना मठांत । पेणचे ते येत लिमये वकील ॥ ४८ ॥थोर थोर येती साधुसंत तेव्हां । देवोनियां भावा बीडकरचरणीं ॥ ४९ ॥वासुअण्णापाशीं चर्चा परमार्थाची । चाले बहुतांची मठीं तेव्हां ॥ ५० ॥बीबीकर वसती मठांत येवोन । मधोन मधीन बीडकरांचे ॥ ५१ ॥दामुअण्णा देशपांडे येती नाशिकाहुन । मानिताती जाण अण्णांसी ते ॥ ५२ ॥सकलही येती दर्शना मठांत । आणिक दर्शन घेत रावसाहेबांचे ॥ ५३ ॥रावसाहेब बाबा तीनही त्रिकाळ । दर्शना तीन वेळ मठीं येती ॥ ५४ ॥सर्वाठायीं करुनी बहु नमस्कार । वासुअण्णा थोर नमिती शेखीं ॥ ५५ ॥वासुअण्णा बाबांसी बहुतचि मानिती । सख्यत्वें बोलती बाबांसंगें ॥ ५६ ॥वासुअण्णा भागवत प्रमुख ते ट्रस्टी । महाराजांसम मानिती बाबा त्यांसी ॥ ५७ ॥विठोबासी आश्रयो देवोनियां त्यांनीं । रामगीता देवोनी वाचीं म्हणती ॥ ५८ ॥दोन तीन दिवस झाले ते येवोन । आले एक दिन मठीं बाबा ॥ ५९ ॥महाराजां आणि सकल दैवतां । वंदोनियां येतां झाला वेळ ॥ ६० ॥त्या वेळीं विठ्ठल वाचीत रामगीता । बैसला कीं होता अण्णांपाशीं ॥ ६१ ॥रावसाहेब येऊन वासुअण्णांपाशीं । पाटावरी सहजेंंसी उभे राहती ॥ ६२ ॥अकस्मात वदले विठ्ठलाकारण । आलासी पळोन कां रे बाळा ॥ ६३ ॥दुजें वाक्य बोलतां पाहती अण्णांकडे । बोट विठोबाकडे करोनियां ॥ ६४ ॥आणिक वदले अतीव वेगानें । आणिक प्रेमानें वाक्य एक ॥ ६५ ॥अक्कलकोटस्वरूपांत हे कीं पाहतात । म्हणोनियां स्वस्थ झाले बाबा ॥ ६६ ॥पाहतां पाहतां देहीं पालटु झाला । दिसूं तो लागला स्वामीसम ॥ ६७ ॥गेले कपडे सारे धोतरही गेलें । स्वामी उभे दिसले कौपीनधारी ॥ ६८ ॥प्रचंड तेजाचा झोत प्रगटला । विठ्ठला नुरला देहभाव ॥ ६९ ॥वासुअण्णांनी तो करुनी नमस्कार । घातलें पायावर विठ्ठलासी ॥ ७० ॥अश्रुपूर चाले नयनीं विठ्ठलाचे । मस्तक बाबांचे चरणावरी ॥ ७१ ॥कांहीं कालानंतर पालटलें सारें । म्हणती विठ्ठला रे उठीं आतां ॥ ७२ ॥नको खेद चिंता करूं तूं बा कांही । येई माझे गेहीं उदईक ॥ ७३ ॥बोलोनियां ऐसें दिधला प्रसाद । गेला सारा खेद मानसींचा ॥ ७४ ॥वासुअण्णा वदती तुझें भाग्य थोर । भेटले सद्गुरु तुजलागीं ॥ ७५ ॥त्यांचे गृहीं उद्यां जरूर तूं जाई । पूर्ण ध्यानीं घेई स्वरूप तें ॥ ७६ ॥विठ्ठलासी झाला अतीव आनंद । मनें धरिला छंद रावसाहेबांचा ॥ ७७ ॥दुजे दिनीं गेला बाबांचे दर्शना । बघुनी त्या बाबांना हर्ष होत ॥ ७८ ॥बैसवोनि जवळी सांगताती गोष्टी । अससी तंव भेटी येत जावें ॥ ७९ ॥न करीं संकोच अससी तूं माझा । होतों गृहीं तुझ्या रत्नागिरिंत ॥ ८० ॥जेवणाचे आधीं बैसावया स्वस्थ । बाबा ते सांगत विठ्ठलासी ॥ ८१ ॥ऐसें हें साधन करावें प्रतिदिनीं । त्यासी वाढवोन साधीं स्वहित ॥ ८२ ॥असतां पुण्यात बाबांचे गृहासी । जाणें विठोबासी घडे नित्य ॥ ८३ ॥घ्यावया दर्शन नित्य तो कीं जात । दुर्गाताई देत खाण्या कांहीं ॥ ८४ ॥बाबा पाठीवरून हात प्रेमभरें । फिरविती खरे प्रतिदिनीं ॥ ८५ ॥तेव्हां दर्शनासी नव्हती ते गर्दी । नव्हती ते उपाधी बाबांसी ती ॥ ८६ ॥क्वचित् कोणी येती जाणोनियां खरें । इतर म्हणती वेडे भ्रमिष्ट ते ॥ ८७ ॥सदा स्वरूपांत बाबा रंगताती । नसे त्यांसि क्षिति इतरांची ॥ ८८ ॥अखंड चिंतनीं गुंतले लोचन । लागोनियां ध्यान आत्मारामीं ॥ ८९ ॥त्यांनीं विठोबासी म्हणोनी आपला । अनुग्रह केला त्याच काळीं ॥ ९० ॥त्या काळीं पुण्यांत कंप्यामाजी होती । एक विभूती ती मोठी संत ॥ ९१ ॥तिचे दर्शनासी रावसाहेबांनीं । आणिक अण्णांनीं धाडियेले ॥ ९२ ॥विठोबासी तिनें देवोनि दर्शन । पटविली खूण सद्गुरूंची ॥ ९३ ॥प्रसाद घातला विठोबाचे मुखीं । स्वहस्तें कौतुकीं वदोनियां ॥ ९४ ॥धन्य तेरा दाता धन्य तेरा दाता । वदोनी स्वहस्ता फिरवी पृष्ठीं ॥ ९५ ॥‘फकीर बाबा’ म्हणुनी एक यवन संत । होते कीं पुण्यांत अधिकारी ॥ ९६ ॥तयांसी भेटला जावोनि विठ्ठल । त्यांनींही तात्काळ ओळखिलें ॥ ९७ ॥ओळखोनि खूण दिली पटवोन । बहुतचि हांसोन प्रेमभरें ॥ ९८ ॥त्या काळीं मठांत वीस पंचवीस पानें । जेवती नेमानें प्रतिदिनीं ॥ ९९ ॥जयराम भटजी करंबेळकर आणिक संन्यासी । प्रतिदिनीं भोजनासी येती मठीं ॥ १०० ॥रुद्र अथवा पवमान म्हणोनी मठांत । ब्राह्मणाने तेथ भोजन घ्यावें ॥ १०१ ॥तेव्हां ती दक्षिणा होती आणे चार । देती हातावर ब्राह्मणाचे ॥ १०२ ॥मठींची सकळ मंडळी त्या काळीं । तापानें जाहली आजारी कीं ॥ १०३ ॥नित्य भोजनास असती मठीं पानें । स्वयंपाक करणें पडे तेव्हां ॥ १०४ ॥कोणी न मिळत स्वयंपाकासाठीं । चिंता करिती मोठी वासुअण्णा ॥ १०५ ॥तंव विठ्ठल आणि रंगा भागवत । सांगती अण्णांप्रत शब्द हे कीं ॥ १०६ ॥आम्ही स्वयंपाक करूं दोन्ही वेळां । नका काळजीला करूं तुम्ही ॥ १०७ ॥तीन मास स्वयंपाक दोघांनीही केला । आणि चालविला नित्य नेम ॥ १०८ ॥बाई महाराज शिष्या बीडकरांची । नाना बापटांची भगिनी जी कीं ॥ १०९ ॥त्याही नव्हत्या मठीं त्या काळीं पुण्यांत । घडला वृत्तांत ऐसा जेव्हां ॥ ११० ॥बाबांकडे जावें प्रतिदिनीं विठोबानें । प्रेमभरें घेणें दर्शन तें ॥ १११ ॥पुढें विठोबासी जाहला आजार । आला ताप फार देहासी तो ॥ ११२ ॥शिखरे वैद्य देती औषध प्रेमानें । बाबा ते नेमानें येऊनी बघती ॥ ११३ ॥वासुअण्णा आणि त्यांची पत्नी थोर । सांभाळिती फार विठ्ठलासी ॥ ११४ ॥वात एक दिनीं झाला आजारांत । हरपुनी जात भान सारें ॥ ११५ ॥तेथें सद्गुरु बाबा, बीडकर आणि स्वामी । रक्षिती स्वधामीं बाळकासी ॥ ११६ ॥दत्त अवधूत तेही स्वयं आले । विठ्ठला रक्षिलें सर्वांनींही ॥ ११७ ॥दिधला पुनर्जन्म निवारोनी व्याधी । संपविली उपाधी आजाराची ॥ ११८ ॥रत्नागिरिस नेलें पुढें विठोबास । दवडुनि भाऊ खास वडिलांनीं ॥ ११९ ॥पुढें विठोबा तो बाबांचे दर्शना । येत पुण्यपत्तना मधुनी मधुनी ॥ १२० ॥एकोणीसशें त्रेपन्न सालीं जून महिन्यांत । विठोबा तो येत दर्शनासी ॥ १२१ ॥बाबांनीं ठरविलें एक ऑगस्टास । देह सोडण्यास सिद्ध झाले ॥ १२२ ॥सकल वृत्तांत नये तो लिहितां । ग्रंथ वाढे निगुता अतीशय ॥ १२३ ॥बाबा-विठोबाचा वाद तो प्रेमाचा । सहा दिवस साचा होता चालू ॥ १२४ ॥म्हणे विठोबा तो मी आधीं जाणार । नाहीं राहणार तुमचे पाठीं ॥ १२५ ॥सहा दिवसांनीं बाबा ते वदले । राहतों मी पुढलें वर्ष एक ॥ १२६ ॥तंव विठोबाची बोली झाली बंद । बाबा विचारीत म्हणों काय ॥ १२७ ॥विठोबासि तेव्हां देवोनि वचन । बाबांनीं भाषण केलें ऐसें ॥ १२८ ॥एकाणीसशें त्रेपन्नीं चोवीस जुलईस । बाबा विठोबास निरोपिती ॥ १२९ ॥आज मी घेतला अहंकार सारा । तुझा कीं रे मुला स्वीकारोन ॥ १३० ॥आतां याचेपुढें तूं कांहीं न करणें । तुझें सर्व करणें करीन मी ॥ १३१ ॥स्वस्थ तूं राहोनी सांगेन तें करीं । बहुतचि वैखरी वदले गोष्टी ॥ १३२ ॥तुझेशीं मी बा आहे निरंतर । सर्वत्रां सर्वत्र सर्वां ठायीं ॥ १३३ ॥एक वर्षा उपरी आज्ञा ती मठाची । आज्ञा जाण साची असे माझी ॥ १३४ ॥जैसें जैसें त्यांनीं असे निरोपिलें । तें तेंची चालिलें असे आज ॥ १३५ ॥त्याच वरुषास गुरुपौर्णिमेसी । पूजिलें बाबांसी विठोबानें ॥ १३६ ॥चरणीं घातिल्या बाबांचे पादुका । पूजा करुनी देखा स्वीकारिल्या ॥ १३७ ॥त्याच वेळीं बाबांनीं स्वकरींच्या दोन । आंगठ्या काढोन दिधल्या त्यासी ॥ १३८ ॥गुरुच्या बोटांतिल दोन या मुद्रिका । गुरुचे बोंटीं लेका स्वकरें घालीं ॥ १३९ ॥पुण्यपत्तनास घेवोनि गृहास । सांभाळावें खास मजलागीं ॥ १४० ॥एकावन्न सालांत आज्ञा ऐसी केली । प्रत्यक्ष चालिली तेचि आतां ॥ १४१ ॥नरहरी काळे सेवक बाबांचे । रामानंदीं साचे दिधलेले ॥ १४२ ॥सर्वदा वर्तन पुण्यपत्तनांत । बाबांची करित सेवा ती कीं ॥ १४३ ॥महाराजांनीं दिलें सेवेसी म्हणोन । आज्ञा ती जाणोन सेवा घेती ॥ १४४ ॥बाबांकडे जाती काळे तीन वेळ । पाहती सकळ कामकाज ॥ १४५ ॥त्यांचे गृहीं पूजा चालते स्वामींची । पुण्यतिथी साची करिती त्यांची ॥ १४६ ॥आज्ञा महाराजांची म्हणुनी बरोबर । बाबा ते सकळ स्थानीं नेती ॥ १४७ ॥नरहरी काळ्यांचा बहुतचि संबंध । बाबांजवळी येत आयुष्यांत ॥ १४८ ॥बहुत स्थित्यंतरें आणि बहुतचि गोष्टी । घडल्या परि न येती लिहायासी ॥ १४९ ॥काळ्यांसी लाविली बाबांनी नोकरी । वास्तुपुस्त सारी करिती त्यांची ॥ १५० ॥काळ्यांची भगिनी नामें मधूताई । बाबांकडे जाई तीही जाणा ॥ १५१ ॥अन्न शिजवोन डबा देती त्यांना । आलें जरी मना खाती बाबा ॥ १५२ ॥ना तरी तैसाच असे तो पडोन । काळ्यांघरीं अन्न जाई रात्रीं ॥ १५३ ॥आपट्यांकडून दुजा डबा येत । पैसे त्याचे देत बाबा नित्य ॥ १५४ ॥गजानन गोखले आणि दत्ता काळे । येती काळ्यांमुळे बाबांपाशीं ॥ १५५ ॥कधींकधीं तेही डबा तो आणिती । मथूताई देती भरोनी जो ॥ १५६ ॥बाबांची मंडळी ज्या कीं दुर्गाताई । सांडियेला त्यांनीं अपुला देह ॥ १५७ ॥आजार तो नव्हता जाहला कीं फार । परी कलेवर खंगले तें ॥ १५८ ॥येई त्यां चक्कर होवोनी भोंवळ । वाढला विकार हाचि फार ॥ १५९ ॥येवोनी चक्कर पडल्या भूमीसी । सोडीलें प्राणांसी माताजींनीं ॥ १६० ॥शके अठराशें सदुसष्ट सालांत । आषाढ मासांत घडले हें ॥ १६१ ॥वद्य ती तृतीया साधियेली त्यांनीं । गेल्या त्या निघोनी कैलासांत ॥ १६२ ॥और्ध्वदेहिक त्यांचें बाबांनींच केलें । सकळही झालें यथासांग ॥ १६३ ॥सत्तावीस जुलई तारीख त्या दिनीं । एकोणीसशें पंचेचाळीस सनीं निर्वल्या ॥ १६४ ॥तेंव्हापासोनियां पुढें एकटेच । रावसाहेब साच राहिले ते ॥ १६५ ॥दुर्गाताई गेल्या निघूनी जगांतोन । पुढें वर्तमान घडे काय ॥ १६६ ॥सेहेचाळीस साला उपरी बाबा यात्रा करिती । नाना स्थानीं जाती यात्रेसाठीं ॥ १६७ ॥काशी गया आणि प्रयाग रामेश्वर । कन्याकुमारी थोर यात्रा झाली ॥ १६८ ॥तेवीं महाबळेश्वरीं यात्रेसी ते गेले । श्रीशैल्यीं पातले यात्रेसाठीं ॥ १६९ ॥गाणगापुरीं आणि गेले अक्कलकोटीं । पंढरपुरीं जाती यात्रेसी ते ॥ १७० ॥पांडुरंग–चरणीं जावोनि लागती । आणि विनविती पांडुरंगा ॥ १७१ ॥हातरूमालांत ठेवोनि पैशांस । म्हणती विठोबास घ्या हो घ्या हो ॥ १७२ ॥आम्ही तों पामर काय तुम्हां देऊं । घ्यावें स्वयमेव आवडे तें ॥ १७३ ॥ऐसें ते वदोन पदीं झाले लीन । साष्टांग नमोन पंढरिनाथा ॥ १७४ ॥जातां रामेश्वरीं मदुरेसी अपरात्रीं । मोटार बंद पडली अकस्मात ॥ १७५ ॥पुढें अकस्मात मोटार एक आली । सर्व मंडळी गेली बसुन त्यांत ॥ १७६ ॥गिरीचा व्यंकोबा आणि मंत्रालयीं । यात्रा करिती तीही सद्गुरु बाबा ॥ १७७ ॥जाउनि सिद्धटेकीं गणपती–दर्शन । करिती सकळ जन बाबांसंगें ॥ १७८ ॥पैठणीं यात्रेसी बाबा निघूनि गेले । दर्शन घेतलें एकनाथांचें ॥ १७९ ॥एक वेळ बाबा गेले कल्याणास । भिड्यांचे गृहास उतरले ॥ १८० ॥राजाभाऊ भिडे गुरुबंधू साचे । राहिले तयांचे गृहीं ते कीं ॥ १८१ ॥नाना फडकयांचे बिऱ्हाडीं जावोन । आले परतून भिड्याघरीं ॥ १८२ ॥कुळगांववासी गेले बाबा जोश्यांकडे । ऐसे थोडे थोडे हिंडती बाबा ॥ १८३ ॥बाबा जोशी यासी मुलगी एकच होती । लग्न झालेली ती तये वेळीं ॥ १८४ ॥तयांसी दिधला पुत्र तो बाबांनीं । सेवा स्वीकारुनी तयांची ती ॥ १८५ ॥एकोणीसशेंत्रेपन्न सालीं बाबा यात्रा करिती । त्यांच्या संगें जाती लोक फार ॥ १८६ ॥गाणगापुरा गेले आणि अक्कलकोटीं । औरंगाबाद ती करिती तेव्हां ॥ १८७ ॥गया काशी आणि जगन्नाथपुरी । कलकत्त्यावेरी जाती ते कीं ॥ १८८ ॥अलाहाबादेसी प्रयागयात्रा करिती । चमत्कार घडती यात्रेमाजी ॥ १८९ ॥परी ते न येथें लिहिणें घडे आतां । संक्षिप्त चरिता योजियेलें ॥ १९० ॥पुढें जेव्हां केव्हां बाबा सांगतील । मोठें तें होईल लिहूनी सारें ॥ १९१ ॥याच यात्रेमाजी गेले अयोध्येस । शरीर सोडण्यास म्हणुनी बाबा ॥ १९२ ॥सर्वांसी सांगती घेणार समाधी । आम्ही शरयूमधीं अयोध्येसी ॥ १९३ ॥देशपांड्यांचे गृहीं राममंदिरांत । स्वर्गद्वारीं उतरत बाबा तेव्हां ॥ १९४ ॥सकल मंडळी घेऊनी शरयू-तीरीं । बाबा ते सकाळीं प्राप्त झाले ॥ १९५ ॥शरयू-स्नानासी आले वाळवंटीं । मंडळी होती कष्टी सकळही ॥ १९६ ॥बाबा सांगताती सकळांसी मात । जातों शरयूप्रत आम्ही दोघे ॥ १९७ ॥नरहरी काळे आणि बाबा गेले । पात्रांत पावले शरयूच्या ॥ १९८ ॥समाधि घेण्यासी डोह शोधिताती । परि तयांप्रती न मिळे डोह ॥ १९९ ॥चवडाभर पाणी असे जेथें तेथें । पंधरावीस मिनिटें फिरती तेव्हां ॥ २०० ॥तदनंतर बाबा वदले काळ्यांस । देते आवाजांस शरयू गंगा ॥ २०१ ॥“अद्यापी न आली वेळ समाधीची । करोनियां स्नानासी परता आतां ॥ २०२ ॥करोनियां स्नान जावें सकळांनीं । पुण्यास परतोनी येथोनियां” ॥ २०३ ॥बाबा स्नान करून आले वाळवंटी । काळेही करिती स्नान तेव्हां ॥ २०४ ॥पाहोनी बाबांसी हर्ष सकळां झाला । करिती स्नानाला सर्व जण ॥ २०५ ॥न घेतां समाधी मी येतों पुण्यास । बीडकर मठास कळविलें ॥ २०६ ॥जामातांचे गृहीं पत्र पाठवोन । केलें निवेदन पत्रानें तें ॥ २०७ ॥माझ्या भक्तांसाठी येतों मी पुण्यास । न घेतां समाधीस लिहिलें ऐसें ॥ २०८ ॥आग्रा आणि मथुरा पाहुनि वृंदावन । घेतलें दर्शन श्रीकृष्णाचें ॥ २०९ ॥परततां पुण्यास उतरले वर्ध्यास । जाऊनी आले गृहास जामातांचे ॥ २१० ॥चहाच घेवोन स्टेशनवरी आले । खऱ्या-गृहीं जेवले इतर लोक ॥ २११ ॥निर्मलाबाईस आणि जामातांस । आशीर्वाद खास दिधला त्यांनीं ॥ २१२ ॥निर्मलाबाईंनीं निजपुत्रा आणोन । पायावरी जाण घातियेलें ॥ २१३ ॥आशीर्वाद त्यासी देवोनियां थोर । हस्त माथ्यावर फिरविला ॥ २१४ ॥सर्वही होईल ठीक तें येथोन । करील हा लग्न ऐसें जाणा ॥ २१५ ॥वाटेमाजी आली कीं दत्त-जयंती । तेव्हा सकळही जाती नाशिकास ॥ २१६ ॥बीडकर मठीं दत्तमंदिरांत । उतरले सद्गुरुनाथ बाबा तेव्हां ॥ २१७ ॥दामुअण्णा देशपांडे करोनी स्वागत । करिती बाबांप्रत नमस्कार ॥ २१८ ॥दत्तजन्म झाला तेथें तो साजरा । सर्वांसी दिधला प्रसाद तो ॥ २१९ ॥तेथोनियां गेले त्र्यंबकेश्वरासी । करुनी दर्शनासी श्रीरामाचे ॥ २२० ॥त्र्यंबकेश्वर-दर्शन कुशावर्ती स्नान । ऐसें हें सारोन' गृहा आले ॥ २२१ ॥कांहीं मंडळी गेली नीलांबा पर्वतीं । तेथें एक वसती सत्पुरुष ॥ २२२ ॥मंडळींनीं केला त्यांसी नमस्कार । तवं झाला प्रकार काय ऐका ॥ २२३ ॥पुसती ते साधु पुढें कोठें जातां । लोक म्हणती आतां जातों पुढती ॥ २२४ ॥पुढें एक असती सत्पुरुष थोर । त्यांसी नमस्कार करावया ॥ २२५ ॥तवं ते साधु वदले सकळ मंडळीस । तुमचे अज्ञानास म्हणों काय ॥ २२६ ॥तुमचेपाशीं गृहीं असतां कीं सद्गुरु । सत्पुरुष थोरू न कळे तुम्हां ॥ २२७ ॥कस्तुरी-मृगास न कळे कस्तुरी कोठें । रानोरानीं हिंडे शोधावया ॥ २२८ ॥तैसें तुम्हांजवळी परब्रह्मनिधान । तया नोळखोन हिंडतसां ॥ २२९ ॥त्र्यंबकेश्वराहूनि येतांना बाबांनीं । आणिल्या जमवोनी वस्तु नाना ॥ २३० ॥देवांच्या तसबिरी आणिक त्या माळा । लसूण कांद्याला गोळा केलें ॥ २३१ ॥शेंगा कोथिंबीर आणिक वस्तु नाना । भरोन खिशांना आणियेलें ॥ २३२ ॥नाशिकास आले परतोनि जेव्हां । भेटले ते तेव्हां गुरुबंधूंस ॥ २३३ ॥दत्तोपंत निरोखेकर गुरुबंधू बाबांचे । नाशिकास त्यांचे वसतिस्थान ॥ २३४ ॥येउनि त्यांचेकेडे भेटोनियां त्यांस । भराभर वस्तुंस फेंकिती पुढें ॥ २३५ ॥आणिक घालोनि साष्टांग नमस्कार । वंदिती सत्वर दत्तोपंतां ॥ २३६ ॥पाहोनिंयां सारा प्रकार तो डोळां । आश्चर्य निरोखेकरां वाटतसे ॥ २३७ ॥म्हणती रावसाहेबांसी हैं हो काय केलें । वस्तूंसी आणिलें कशासीं या ॥ २३८ ॥गंभीर दत्तोपंत हंसले तेव्हां फार । आश्चर्य उद्गार काढोनियां ॥ २३९ ॥म्हणावें यां मुक्त करिती वेड्यासम । बद्ध म्हणतां ब्रह्म झाले असती ॥ २४० ॥महाराजांची लीला न कळे ती कोणास । करिती आश्वर्यास सकळिक ॥ २४१ ॥चहापाणी तेव्हां घेवोनियां तेथ । आले पंचवटींत परतोनी ॥ २४२ ॥दुजे दिनीं आले पुण्यास परतोनि । सांगाती घेवोन सकळिकां ॥ २४३ ॥ठायीं ठायीं होती चमत्कार फार । नाहीं पारावार तयांलागी ॥ २४४ ॥पुढें मोठ्या ग्रंथीं समग्र लेखन । बाबा घडवोन आणतील ॥ २४५ ॥त्यांचे तें चरित्र असल्या इच्छा त्यांची । करतील लेखनाची पूर्ती ते कीं ॥ २४६ ॥गाणगापूर-यात्रेत बाबांचे सांगातीं । कुळकणीं मास्तर जाती यात्रेंसी ते ॥ २४७ ॥त्यांच्या पिशाच्चासी दवडिलें बाबांनीं । मार्गासी लावोनी दिधलें त्यासी ॥ २४८ ॥त्यांचा मुलगा तो कीं वसंता कुळकणी । तयाचे बाबांनी हित केलें ॥ २४९ ॥अण्णा देशपांडे धुळ्याचे असती । त्यांसी अनुग्रह देती सद्गुरु बाबा ॥ २५० ॥बी.ए.बी.टी. ते कीं आहेत मास्तर । हायस्कूलांत नोकर सरकारी त्या ॥ २५१ ॥त्यांसी अनुभव येती वारंवार । प्रीती त्यांची फार बीडकर-मठीं ॥ २५२ ॥संस्कृत कवित्व करिती हे छान । बाबांचें वर्णन करिती त्यांत ॥ २५३ ॥यांसी अनुग्रह दिधली उपासना । लाविलें त्यांसी ध्याना मध्यरात्रीं ॥ २५४ ॥निष्ठा यांची फार बाबांचे चरणीं । स्मरती क्षणोक्षणीं बाबांसी ते ॥ २५५ ॥बाबांसंगे गेले यात्रे गाणगापुरीं । घेउनि बरोबरी मातेसी हे ॥ २५६ ॥यांची माता होती शिष्या ती बाबांची । पिशाच्चपीडा तिची दूर केली ॥ २५७ ॥ताई देशपांडे गेल्या निवर्तान । आतां तें कथीन वृत्त दुजें ॥ २५८ ॥चिदानंदांचिये धर्मशाळेमाजी । गाणगापुरासी जी राहाती बाबा ॥ २५९ ॥बाहेर ओट्यावरी बसले एक दिन । सवें ते घेवोन सकळ भक्तां ॥ २६० ॥देशपांडे अण्णा तेथ कीं बैसले । त्यांसी पाचारिलें बाबांनीं तें ॥ २६१ ॥समोरी ती भीमा दुथडी भरोन । भरोनियां पूर्ण वाहातसे ॥ २६२ ॥बाबा सकळांसी वदले उत्तर । कोण नदी पार जाईल आतां ॥ २६३ ॥जावोनी पल्याड आणावी ती रेती । इच्छा ही निगुती असे माझी ॥ २६४ ॥सकळही स्वस्थ भक्त ते बैसले । कोणी न च बोले तेव्हां कांहीं ॥ २६५ ॥अण्णा देशपांडे उठुनी उभे ठेले । आणिक गर्जले मी हो जातों ॥ २६६ ॥तुमचीये कृपेनें पल्याड जावोन । रेती ते घेवोन येईन मी ॥ २६७ ॥अण्णा मास्तरांनीं करुनी नमस्कार । मस्तक चरणावर ठेवियेलें ॥ २६८ ॥आशीर्वाद बाबा देती तेव्हां त्यांसी । मिळवाल यशासी ईशकृपें ॥ २६९ ॥अण्णा मास्तरांनीं कसीयेला कांचा । आणि जावयाचा बेत केला ॥ २७० ॥त्यासवें जावया नरहरी काळे । तये वेळीं झाले सिद्ध तेही ॥ २७१ ॥दोघेही निघोन उतरले भीमेंत । भीमा ते वहात भरोनिया ॥ २७२ ॥सद्गुरुंचा जप करिती देशपांडे । चालती आनंदें पाण्यामाजी ॥ २७३ ॥गेली भय भीती सांडोनि तयांस । धरितांच बाबांस मनीं त्यांनीं ॥ २७४ ॥एक एक पाऊल जाती उचलीत । पाणी तें कीं येत वरिवरि ॥ २७५ ॥गळ्यावेरी आलें पाणी तें अण्णांच्या । परी तोंडीं त्यांच्या न च जात ॥ २७६ ॥सवें ते कीं काळे त्यांच्याही गळ्यास । पाणी येत खास तैसेंची कीं ॥ २७७ ॥शेवटवेरी जातां पाणी गळ्यावेरी । गेले पैलतीरीं देशपांडे ॥ २७८ ॥इकडे ओट्यावरी बैसोनियां बाबा । दृष्टीचा वोंथंबा२ धरती तेथ ॥ २७९ ॥टक लाबोनियां त्या कीं दोघांवरी । बैसले बाहेरी बाबा तेव्हां ॥ २८० ॥घेवोनियां रेती अण्णा परतले । त्यांचेंसवें आले काळे तेही ॥ २८१ ॥येतां परंतोन तेवढेच पाणी । लक्षिलें दोघांनीं तैसेंचि तें ॥ २८२ ॥अमाप तें जल असतां बहु खोल । झालें गळाभर दोघांसी तें ॥ २८३ ॥सद्गुरुचे कृपें परतोनि आले । यश तें मिळालें देशपांड्यांसी ॥ २८४ ॥आणियेली रेती ठेविली बाबांपुढती । चरणांतें वंदिती प्रेमभरें ॥ २८५ ॥आनंदाश्रू आले नयनीं मास्तरांच्या । शब्द न उमटे वाचा सद्गदीत ॥ २८६ ॥सद्गुरु बाबांनीं उठवोन त्यांसी । वंदिलें रेतीसी धरूनी भालीं ॥ २८७ ॥ज्ञान-वैराग्याची असे ही कीं रेती । लावा भाळाप्रती सकळिक ॥ २८८ ॥सर्वांनीं ती रेती धरोनि मस्तकीं । वंदिली कीं निकि तात्काळची ॥ २८९ ॥अण्णा मास्तर झाले गुरुकृपें यशस्वी । परीक्षा ही बरवी पास झाले ॥ २९० ॥कृपा त्यांचेवरी असे कीं बाबांची । अतीव प्रेमाची सत्य सत्य ॥ २९१ ॥श्रीपाद गोखले भक्त तो बाबांचा । जाई दर्शना त्यांच्या प्रतिदिनीं ॥ २९२ ॥मॅट्रिक परिक्षेमाजीं यश तें न येत । नापास तो होत वेळोवेळां ॥ २९३ ॥बाबा सांगताती लावीं उदबत्तीस । करूनी प्रार्थनेस बीडकरांसी ॥ २९४ ॥चार पांच वेळां ऐसेंचि तें झालें । यश न मिळालें तयासी तें ॥ २९५ ॥लोक चिडविती काय देती बाबा । वायांचि तूं कां बा श्रमतोसी ॥ २९६ ॥तरी त्याचा विश्वास बाबांवरी खास । शेखीं अखेरीस पास झाला ॥ २९७ ॥बाबांनीं वाटिले पेढे सकळांस । श्रीपाद तो पास झाला म्हणती ॥ २९८ ॥चेष्टेखोर झाले खजील ते फार । शब्द न उच्चार करिती मग ॥ २९९ ॥भालू थत्ते यासी आणि श्रीपाद गोखल्यासी । बिळे लिंपयासी सांगती बाबा ॥ ३०० ॥उंदरांचीं बिळे प्रतिदिनीं लिंपोन । जाती परंतोन स्वगृहासी ॥ ३०१ ॥दुजे दिनीं येता बाबांच्या दर्शना । जैशीं तैशीं पुन्हा दिसती बिळे ॥ ३०२ ॥पुनरपि लिंपाया सांगती सद्गुरु । खेळ महिनाभरू चाले हाची ॥ ३०३ ॥चार दिवसांचें शिळे अन्न त्यांसी । द्यावेखावयासी प्रसाद तो ॥ ३०४ ॥परी न त्या अन्ना वास तिळभरी । ताजें भासे तरी जैसें तैसें ॥ ३०५ ॥श्रीपाद गोखल्यासी बाबांनीं ते दिले । रूपये त्या वेळे भांडवलासी ॥ ३०६ ॥भांडवल म्हणोन ठेवावें जपोन । घालोनी दुकान करि तूं धंदा ॥ ३०७ ॥आज्ञेप्रमाणें तो भुसार-मालाचा । आणिक दुधाचा धंदा करितो ॥ ३०८ ॥भागीदार असती त्याचे या धंद्यांत । परी ना तें होत भांडण कीं ॥ ३०९ ॥भागीदारपत्र करूनि रजिस्टर । मिळोनी सर्वत्र धंदा करिती ॥ ३१० ॥धंदा करूनी त्यानें बांधियेलें घर । पुण्यास तें थोर एरंडवण्यांत ॥ ३११ ॥पत्नी मुलगे आणि वडील-मातेसह । राहोनि निर्वाह करीतसे ॥ ३१२ ॥बंधु-भगिनींसी देवोनि शिक्षण । चतुर करून ठेवियेलें ॥ ३१३ ॥गृहीं सकलांची निष्ठा बाबांवरी । असे ती कीं पुरी भक्तियुक्त ॥ ३१४ ॥उपासना श्रीपादा दिधली बाबांनीं । करितो प्रतिदिनीं तो ही तीच ॥ ३१५ ॥अण्णा गोखले हे वडील श्रीपादाचे । निष्ठावंत साचे असती भक्त ॥ ३१६ ॥त्यांसीही रक्षिलें बाबांनीं हें सत्य । अर्धांग-वातांत आजवेरी ॥ ३१७ ॥तेही नित्य करिती उपासना फार । श्रद्धा बाबांवर ठेवोनिर्या ॥ ३१८ ॥पुढिलिये अध्यायीं आणिक भक्तांचीं । नामें अनेकांचीं कथिजितील ॥ ३१९ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । एकादश अध्याया झाली समाप्ती ही ॥ ३२० ॥येथून ऐका