संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय २१०:२७करोनि वंदन गजवदनासी । करूं आरंभासी ग्रंथाचिये ॥ १ ॥सद्गुरु बाबांचे सहस्रबुद्धे कुळ । अतीव सोज्ज्वळ असे जाणा ॥ २ ॥कोंकणस्थ चितपावन ब्राह्मण । धर्म सनातन वैदिक तो ॥ ३ ॥थोर थोर झाले वैदिक या कुळीं । शास्त्रीही त्या काळीं ज्ञानवंत ॥ ४ ॥बाबांचे वंशज रत्नागिरी प्रांतीं । झाले करिते वस्ती फार पूर्वी ॥ ५ ॥पेशवाईचेही अगोदर यांचा । वास कोतवड्याचा असे मूळ ॥ ६ ॥रत्नागिरीपासाव द्वादश मैल दूर । कोतवडें सुंदर असे ग्राम ॥ ७ ॥सहस्रबुद्ध्यांनीं ग्राम वसविला । समाज तो केला संघटित ॥ ८ ॥अठरापगड जाती आणोनियां तेथ । ग्राम वसवीत पूर्वज ते ॥ ९ ॥बाराहि वाड्यांचा असे हा कीं गांव । बहुत वैभव वाढविलें ॥ १० ॥अगणित संपत्ती यांचे पूर्वजांनीं । ग्रामांत आणोनी ठेवियेली ॥ ११ ॥अरण्यें तोडोनी मही संपादिली । शेती सिद्ध केली नाना ठायीं ॥ १२ ॥प्रथम या कुळासी नाम 'गणपुले' । होतें तये वेळे प्रसिद्धची ॥ १३ ॥उपरी कालांतरें बुद्धि चमकली । साक्ष ते पटली सरकारांत ॥ १४ ॥तेथोनियां नाम मिळे सहस्रबुद्धे । नांदती अविरोधें समाजांत ॥ १५ ॥बारा विभागांचे स्थापियेलें ग्राम । केलें बहु काम रयतेसाठीं ॥ १६ ॥बाराहि वाड्यांत असे यांची वस्ती । सुसंपन्न स्थिती सकळांची ॥ १७ ॥मोठमोठे वाडे उभारोनी तट । निर्मियले नीट स्वग्रामांत ॥ १८ ॥नोकर-चाकर असती बहुत । शागीर्दही तेथ सेवेलागीं ॥ १९ ॥कुसुमेश्वरशंकर शिवाचें मंदिर । निर्मियेलें थोर ग्रामामाजी ॥ २० ॥अनेक त्या देवी स्थापोनियां तेथ । उपासना लावित सकळ जनां ॥ २१ ॥जोगेश्वरी यांची कुळींची देवता । स्थापिली निजहिता मंदिरांत ॥ २२ ॥सूर्यनारायण आणि गणपती । स्थापोनियां कीर्ति वाढविली ॥ २३ ॥स्वयंभू तें स्थान वसे नदीतीरीं । महालक्ष्मी खरी जगदंबा ॥ २४ ॥भूमींतूनि आली वारूळामधोन । आदिशक्ती पूर्ण कारणिक ॥ २५ ॥देवोनी दृष्टांत कथियेली मात । आणि आज्ञापीत सहस्रबुद्ध्यांसी ॥ २६ ॥निर्मांनियां मूर्ति सुंदर पाषाणाची । करा मंदिराची उभारणी ॥ २७ ॥परी न मोडावें मूळ तें वारूळ । वसतें माझें स्थळ मूळ जें कीं ॥ २८ ॥आज असे तेथ मंदीर प्रत्यक्ष । देई जें कीं साक्ष सकळिकां ॥ २९ ॥आणीक ग्रामींच्या टेकडीवरौतें । अरण्यी निगुतें एक स्थान ॥ ३० ॥धारणा देवीचें वसण्याचें स्थळ । जाणावें सकळ भाविकांनी ॥ ३१ ॥ऐशा देवतांनीं संपन्न हा गांव । रक्षिला सदैव जात असे ॥ ३२ ॥सहस्रबुद्ध्यांच्या कुळीं एक शाखा । धामेळ्यांत देखा स्थिरावली ॥ ३३ ॥वाडा निर्मांनियां धामेळे भागांत । वसती शांतचित्त पूर्वज कीं ॥ ३४ ॥शांडिल्य गोत्रींचे ब्राह्मण हे जाणा । ऋग्वेदी ब्राह्मणांमाजी गणती ॥ ३५ ॥आश्वलायन सूत्र शाकलशाखाध्यायी । संपादिलें ज्यांही वेदज्ञान ॥ ३६ ॥शांडिल्य असित देवल हे तीन । प्रवर जाणोन घ्यावे यांचे ॥ ३७ ॥सांब सदाशिव शंकराचें स्थान । केलेंसे निर्माण धामेळ्यांत ॥ ३८ ॥नाम धाम्णेश्वर मंदिर तें थोर । घुमटांसहित फार असे भव्य ॥ ३९ ॥जागृत दैवत आजही वर्तत । साक्ष जनांप्रत येई नित्य ॥ ४० ॥भोळा तो शंकर रक्षी सकळांसी । पाहोनि भक्तीसी इष्ट देई ॥ ४१ ॥शिवभक्ति असे थोर या कुळांत । झाले भक्तिमंत लोक कांहीं ॥ ४२ ॥नित्य गणेशाची उपासना चाले । उत्सव बहुवेळे करिती त्याचा ॥ ४३ ॥प्रेमें आळवोनि गजवदनासी । प्रार्थिती तयासी नम्रभावें ॥ ४४ ॥बहू गाणपत्य झाले या कुळांत । वक्रतुंडाप्रत मानिती जे ॥ ४५ ॥जगदंबेचीहि चाले उपासना । जोगेश्वरी ध्याना आणुोनियां ॥ ४६ ॥महालक्ष्मीचें करोनी नवरात्र । भजती अहोरात्र पूर्वज ते ॥ ४७ ॥बहूत पूर्वज उपासिती दत्ता । प्रेमें अवधूता आळवोनी ॥ ४८ ॥औदुंबरातळी असती पादुका । साक्ष देती देखा आजही त्या ॥ ४९ ॥बाबांच्या घराचा ओस तो चौथा । देई साक्ष बरा पूर्वजांची ॥ ५० ॥दत्ताचे भक्तींत रंगले कितिएक । वैराग्य विवेक घेवोनियां ॥ ५१ ॥ऐशा या धामेळे वाड्यामाजी असे । सद्गुरु बाबांचे मूळ घर ॥ ५२ ॥यांच्या पूर्वजांनीं आणिले पुरोहित । ब्रह्मकर्म नित्य चालावया ॥ ५३ ॥'पटवर्धन' नाम असे त्या ब्राह्मणां । करिती पुरोहितपणा कुळाचा या ॥ ५४ ॥तेचि पटवर्धन पुढें झाले थोर । उपासोनि निरंतर गणेशासी ॥ ५५ ॥गणपतीपुळ्यांत स्वयंभू गणपती । तया ते भजती पटवर्धन ॥ ५६ ॥एका पटवर्धनें केली उपासना । विसरोनि जाणा देह गेहं ॥ ५७ ॥तयाते जाहला प्रसन्न गणराज । भक्ताचें तें काज पूर्ण करी ॥ ५८ ॥तेचि पटवर्धन पुढतीं झाले राजे । सांगली, जमखिंडी गाजे शौर्य ज्यांच्या ॥ ५९ ॥परी पटवर्धन मूळांत उपाध्ये । यजमान सहस्त्रबुद्धे असती यांचे ॥ ६० ॥कांहीं काळ जातां यांचे पूर्वज आले । त्यजोनि आपुलें मूळ ग्राम ॥ ६१ ॥इचलकरंजी संस्थांनी ते येत । राहाया शोधित उचित ग्राम ॥ ६२ ॥बोरगांवानजवळ 'मजरे-मने-राजुरी' । या ग्रामाभीतरीं वस्ती केली ॥ ६३ ॥बाबांचे आजोबा विठ्ठलपंत थोर । शेती करिती फार याच ग्रामीं ॥ ६४ ॥एकशत अधिक आठ ते एकर । जमीन ती शीघ्र मेळविली ॥ ६५ ॥बसायासि घोडा, त्याचे पायीं तोडा । सरंजामीं जोडा जोडीयेला ॥ ६६ ॥करोनियां शेती धान्य पिकविती । धन मेळवती बहुतची ॥ ६७ ॥येतां शेतावरूनी दुधाच्या कासांड्या । भरोनियां हंड्या आणिતી घरा ॥ ६८ ॥विठ्ठलपंतांसी पतंगाचा शौक । असे बहुतेक सर्व काळ ॥ ६९ ॥करोनियां थोर थोर त्या वावड्या' । उडविती उघड्या आकाशांत ॥ ७० ॥पतंगाच्या छंदें वेधियेलें मन । साक्ष अजुनी पूर्ण असे तेथ ॥ ७१ ॥पतंगाचे साठी सुतळीचे गाठोडें । त्यांनी संपादिले असे आज ॥ ७२ ॥ऐसे प्रतिष्ठित पुरुष विठ्ठलपंत । धनधान्ये समृद्ध वस्ती नित्य ॥ ७३ ॥कुरुंदवाडांत निर्मियेलें घर । राहावया थोर पूर्वजांनीं ॥ ७४ ॥विठ्ठलपंताचा पुत्र जो कीं साचा । ऐकावा तयाचा वृत्तांतही ॥ ७५ ॥नारायण नाम तयासी ठेविलें । अप्पाजी जाहले परी ते ख्यात ॥ ७६ ॥हेही दत्तभक्त होते सत्य जाणा । म्हणुनी दत्तराणा जवळी ठेवी ॥ ७७ ॥शिकोनियां झाले आंग्लविद्यायुक्त । सेवा ते करीत सरकारांत ॥ ७८ ॥इंजिनिअरिंग खात्यांत नोकरी । करितात बरी अप्पाजी ते ॥ ७९ ॥सब ओव्हरसिअर होते त्या खात्यांत । धर्मकार्ये रत तेवीं जाणा ॥ ८० ॥संस्थान तासगांव खालसा तें होतां । कुरुंदवाडीं दत्तापाशीं आले ॥ ८१ ॥घेवोनी पेन्शन सोडोनो नोकरी । कुरुंदवाडीं घरीं राहती नित्य ॥ ८२ ॥सेविती ते नित्य दिगंबर दत्त । तेणें शांत चित्त होवोनियां ॥ ८३ ॥गृहस्थधर्मासी चालविती थोर । तेवीं धर्माचार रक्षोनियां ॥ ८४ ॥भार्या पतिव्रता नामें लक्ष्मीबाई । नित्य यांचे राही सान्निध्यांत ॥ ८५ ॥कुलधर्म कुलाचार चालविती सारे । गृहिणीपद खरें भूषवोनी ॥ ८६ ॥असे धर्मनिष्ठ भक्तिपरायण । पत्नी नारायणरावांची ती ॥ ८७ ॥लक्ष्मीनारायण जोडा हा सुरेख । भूमीवरी एक वर्ततसे ॥ ८८ ॥माहेर बोरगावीं मोडकांचे घरीं । जाणावें चतुरीं बाईचें या ॥ ८९ ॥मोडक घराणें धनधान्ययुक्त । संपत्ती वसत्त ज्यांचेपाशीं ॥ ९० ॥आणिक इश्वरीं श्रद्धा ज्यांची भारी । उत्तम संस्कारीं संपन्न जे ॥ ९१ ॥भक्तिपरायण आणिक सज्जन । यांचे कुळीं जन धर्मरत ॥ ९२ ॥ऐसिये कुळींची कन्या यमुनाबाई । भार्या वरिली ती ही नारायणें ॥ ९३ ॥बहु कन्या आणि सुत यांसी झाले । गृह तें शोभलें संततीनें ॥ ९४ ॥नारायणरावांचे जेष्ठ पुत्र जाणा । कृष्णाजी जयांना नाम साजे ॥ ९५ ॥मुंबापुरीमाजीं सेक्रेटरीएट । ऑफिसांत नीट करिती सेवा ॥ ९६ ॥सुपरवायझराची होती त्यां नोकरी । सेवा करीती बरी मनोभावें ॥ ९७ ॥यांसही दत्ताची असे भक्ति फार । परी बडिवार न दाविती ॥ ९८ ॥कृष्णाजी परशराम भिडे हे गृहस्थ । श्वशुर कीं होत यांचे जाणा ॥ ९९ ॥नाना महाराज साखरे यांचे शिष्य भिडे । भजक हे गाढे ज्ञानेश्वरीचे ॥ १०० ॥यांसी मृत्यु आला हृदयविकारानें । केलें स्वर्गीं पेणें३ कृष्णाजींनीं ॥ १०१ ॥सद्गुरु बाबांचे बंधु ते कीं सान । हरी नाम शोभोन दिसे ज्यांसी ॥ १०२ ॥वकिलीपरीक्षा देवोनियां त्यांनीं । जुन्नरीं राहोनी वकिली केली ॥ १०३ ॥शिवाजीमहाराज जे कीं राष्ट्रपुरुष । तयांचा यां ध्यास असे फार ॥ १०४ ॥शिवनेरीवरी शिवजयंतीचा । उत्सव थाटाचा करिती हे ॥ १०५ ॥मृत्यु पावोनिंयां हेही निवर्तले । सेवा करूनी गेले शिवरायांची ॥ १०६ ॥एक भगिनी यांची कानीटकरान्सी । दिली होती साची पुण्यामाजी ॥ १०७ ॥दुजी भगिनी नामें जी कीं वेणुताई । दिली असे पाहीं जुन्नरांत ॥ १०८ ॥नारायण धोंडो जोशी फौजदार । त्यांचे गृहीं थोर दिधली भगिनी ॥ १०९ ॥सासरीचें नांव लक्ष्मीबाई जोशी । बंधू-भगिनीसी प्रेम थोर ॥ ११० ॥हिचे पुत्र धोंडदेव नामें असती । वकील जुन्नराप्रती सांप्रत जाणा ॥ १११ ॥बाबांचे हे भाचे आणि होती साडू । प्रेमें दोघां दृढ बांधियेले ॥ ११२ ॥बालपणीं दोघे एकत्र वसती । अन्योन्यीं ती प्रीती होती फार ॥ ११३ ॥तेवींच बाबांचे शिष्य अनुगृहीत । असती हे सत्य बऱ्याबापू ॥ ११४ ॥सहस्रबुद्ध्यांच्या कुळाचा इतिहास । कथिला समजायास सुज्ञ जनां ॥ ११५ ॥तेवींच कथन माता-पिता यांचे । बंधू-भगिनींचें केलें असे ॥ ११६ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । पूर्ती झाली बरी द्वितीयाध्याया ॥ ११७ ॥येथून ऐका